Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्राची 'सिटाडेल' रिलीज होताच ठरली अव्वल; या वेबसीरिजला टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 18:32 IST

Priyanka Chopra : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनास हीची नवी कोरी वेब सीरिज सगळ्या वेब शो ला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर आली आहे.

प्रियांका चोप्रा जोनास(Priyanka Chopra-Jonas)चा स्पाय-थ्रिलर 28 एप्रिल 2023 रोजी जागतिक स्तरावर सर्वत्र रिलीज झाला. चाहत्यांना प्रियांकाला वेगळ्या अंदाजात पाहिलं आहे आणि तिच्या अभिनयाचा अनोख्या शेड्स आणि तिच्या व्यक्तिरेखेचे ​​प्रेक्षकांनी कौतुक केलं. आमच्या जागतिक आयकॉनने तिच्या अ‍ॅक्शन-पॅक परफॉर्मन्सने तिने जगभरात प्रेक्षकांची मन जिंकून घेतली.

FlixPatrol च्या अहवालानुसार सिटाडेल सध्या अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर जागतिक स्तरावर सक्सेशन आणि द मंडलोरियन आणि स्वीट टूथ ला मागे टाकत पहिल्या स्थानावर आहे. चाहते आणि समीक्षक प्रियांका चोप्रा जोनासची प्रशंसा करतात. तिने नादिया सिन्हच्या भूमिकेत स्वतःला सिद्ध केलं आहे. तिच्या भूतकाळातील एकही वाक्य आठवत नसलेल्या व्यक्तीकडून पूर्ण विकसित अ‍ॅक्शन सीक्वेन्समध्ये तिची भाषा आणि वर्ण यांचे सहज बदल अभूतपूर्व आहे.

रिचर्ड मॅडेन सह-कलाकाराच्या आगामी भागांची जागतिक स्तरावर प्रतीक्षा आहे आणि चाहते प्रियंका चोप्राच्या कामगिरीचा अनुभव घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. सिटाडेल च्या सोबतीने या ग्लोबल सुपरस्टारकडे जॉन सीना, लव्ह अगेन आणि कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत जी ले जरा हेड ऑफ स्टेट हे आगामी प्रोजेक्ट आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्रा