दरम्यान, प्रियंकासाठी हे वर्ष खूपच स्पेशल राहिले आहे. सध्या प्रियंका ‘क्वांटिको’च्या तिसºया सीजनची शूटिंग करीत आहे. त्याचबरोबर इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोवर्सची संख्या दोन कोटींपेक्षा अधिक झाली आहे. त्याचबरोबर तिला दोन हॉलिवूड चित्रपटांची आॅफरही लागली आहे. प्रियंकाने ‘इसिंट इट रोमॅण्टिक’ आणि ‘अ किड लाइक जेक’ हे दोन चित्रपट साइन केले आहेत. लवकरच ती या चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
काही दिवसांपूर्वीच प्रियंकाने तिच्या ‘क्वांटिको-३’साठी एक नवा लूक धारण केला आहे. याविषयी प्रियंकाने सांगितले की, ‘या शोसाठी मला माझे लांब केस कापावे लागले.’ याबाबतचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘बाय बाय लॉन्ग हेअर... सीजन-३ मध्ये एलेक्स पॅरिशचा लूक कसा असेल? हे तुम्हाला लवकरच समजणार आहे. दरम्यान, प्रियंका राकेश ओम प्रकाश यांच्या ‘सॅल्युट’ या चित्रपटात आमिर खानसोबत बघावयास मिळू शकते.