Join us

प्रियांका चोप्राचे डॅमेज कंट्रोल! भाईजानची नाराजी दूर करण्यासाठी केले असे ट्विट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 10:51 IST

एकीकडे प्रियांकाचा हॉलिवूड प्रोजेक्ट लांबला आणि दुसरीकडे सलमानची नाराजी तिला सहन करावी लागतेय. ही नाराजी फार काळ टिकता कामा नये, हे प्रियांकाने हेरले आणि तिचे प्रयत्न सुरु झालेत.

‘भारत’ सोडून आपण उगाच भाईजानची नाराजी ओढवून घेतली, याची जाणीव कदाचित प्रियांका चोप्राला झाली असावी. प्रियांकाने ‘भारत’ का सोडला, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. सूत्रांचे मानाल तर भलतेच कारण सांगून प्रियांकाने ऐनवेळी या चित्रपटातून अंग काढून घेतले. नेमक्या याचमुळे सलमान खान नाराज झाला. प्रियांकाने ‘भारत’ सोडतांना आम्हाला भलतेच कारण सांगितले, हे सलमानचे शब्द बरेच काही सांगणारे आहेत. आता भाईजानची नाराजी ओढवून घेणे, कुणाला परवडणार? प्रियांकालाही हे कळले असावे. एकीकडे प्रियांकाचा हॉलिवूड प्रोजेक्ट लांबला आणि दुसरीकडे सलमानची नाराजी तिला सहन करावी लागतेय. ही नाराजी फार काळ टिकता कामा नये, हे प्रियांकाने हेरले आणि तिचे प्रयत्न सुरु झालेत.

 

 होय, सलमानला खूश करण्याचे, त्याची मनधरणी करण्याचे प्रयत्न. याच डॅमेज कंट्रोलचा भाग म्हणजे, प्रियांकाचे ताजे ट्विट, होय, प्रियांकाने सलमानचा मेहुणा आयुष शर्मा याला ढाल केले. सलमानच्या बॅनरखाली आयुष शर्मा बॉलिवूड डेब्यू करतोय, हीच संधी प्रियांकाने हेरली आणि आयुष शर्मा व त्याचा आगामी चित्रपट ‘लवरात्रि’बद्दल खास ट्विट केले. ‘माझा मित्र आयुष शर्मा तुझे बॉलिवूडमध्ये स्वागत. ट्रेलर पाहून तुझा डेब्यू शानदार असणार, असा विश्वास वाटतोय, आॅल द बेस्ट वरिना हुसैन आणि ‘लवरात्रि’ला खूप सारे प्रेम’, असे प्रियांकाने लिहिले.आता प्रियांकाच्या या ट्विटने सलमानचा राग किती शांत होतो, ते बघूच...

प्रियांका चोप्राने सोनाली बोसच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या 'स्काई इज पिंक' सिनेमाची शूटिंग सुरु केली आहे. यात प्रियांका आणि फरहान अख्तरची मुख्य भूमिका आहे. दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्रासलमान खान