Join us
Daily Top 2Weekly Top 5

...अन् तोपर्यंत निक जोनासने शांतपणे पाहिली प्रियांकाची वाट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 09:26 IST

परत येईलपर्यंत कुठलीही कुरबूर न करता, अगदी संयमाने निक जोनासने प्रियांकाची प्रतीक्षा केली. यावेळची त्याची बॉडीलँग्वेज बरेच काही सांगणारी होती. 

प्रियांका चोप्राने भारतीयाऐवजी एका विदेशी तरूणाची निवड का करावी? त्यातही अमेरिकन सिंगर निक जोनास याच्यावरचं ती का लट्टू व्हावी? या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर बातमीसोबतचा हा ताजा व्हिडिओ पुरेसा आहे. होय, सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरतो आहे. हा व्हिडिओ आहे अमेरिकेतल्या कुठल्याच्या रस्त्यावरचा. आता अमेरिका म्हटले तरी तिथेही प्रियांकाच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. तर झाले असे की, प्रियांका निकसोबत डिनर डेटवर निघाली. पण रेस्टॉरंट बाहेर एका चाहतीने प्रियांकाला सेल्फी देण्याचा आग्रह केला. प्रियांकानेही चाहतीचा हा आग्रह मानला आणि तिच्यासोबत पोझ देण्यात बिझी झाली. इतकी की, काही क्षण निक आपल्यासोबत आहे, हेही ती विसरली. पण निक मात्र अगदी शांतपणे रस्त्याच्या कडेला उभा राहिला. प्रियांका आपल्या चाहतीसोबत पोझ देऊन परत येईलपर्यंत कुठलीही कुरबूर न करता, अगदी संयमाने त्याने प्रियांकाची प्रतीक्षा केली. यावेळची त्याची बॉडीलँग्वेज बरेच काही सांगणारी होती. कदाचित निकचा हाच स्वभाव प्रियांकाला आवडला असावा आणि ती त्याच्यावर भाळली असावी, कोण जाणे!!

तूर्तास निक व प्रियांका अमेरिकेत आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच खास प्रियांकाच्या आईला भेटायला निक भारतात आला होता. येथे काही दिवस राहिल्यानंतर प्रियांकासोबत तो अमेरिकेत परतला. मात्र ताज्या बातमीनुसार, निक पुन्हा काही दिवसांत भारतात येणार आहे. होय, प्रियांकाच्या ‘भारत’ या बॉलिवूडपटाचे शूटींग लवकरच सुरु होतेय. त्यामुळे प्रियांका पूर्णवेळ भारतात असेल. अर्थातचं तिला कंपनी द्यायला निकही याकाळात भारतात असेल. तूर्तास आपली सर्व पूर्वनियोजित कामे संपवण्याचे निकचे प्रयत्न आहेत

टॅग्स :प्रियंका चोप्रा