Join us
Daily Top 2Weekly Top 5

Hotness Alert! प्रियंका चोप्राचे ट्रान्सफरन्ट ड्रेसमधील फोटो पाहून म्हणाल wow!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 18:04 IST

या फोटोत प्रियंका अतिशय हॉट दिसत असून तिने एक ट्रान्सफरन्ट ड्रेस घातला आहे.

ठळक मुद्देप्रियंकाचा बोल्ड अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल. सोशल मीडियावर प्रियंकाचे व्हायरल झालेले हे फोटो अतिशय हॉट आणि बोल्ड अंदाजातले आहेत.

देसी गर्ल आणि पिग्गी चॉप्स अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपला पती निक जोनाससह सध्या आपली फॅमिली लाईफ एन्जॉय करते. वेळोवेळी ती तिचे सगळेच फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनयासह तिच्या बोल्ड फोटोची ही वारंवार चर्चा होत असते. काही महिन्यांपूर्वी प्रियंकाच्या सोशल मीडियावरील अशाच हॉट आणि सेक्सी फोटोंची खुमासदार चर्चा रंगली होती. या प्रत्येक फोटोमध्ये तिचा खास आणि हटके अंदाज पाहायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा असेच हॉट फोटो समोर आले आहेत.

प्रियंका आणि निकचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत हातात हात घालून प्रियंका आणि निक फिरत असल्याचे दिसत आहे. या फोटोत प्रियंका अतिशय हॉट दिसत असून तिने एक ट्रान्सफरन्ट ड्रेस घातला आहे. तिच्या या बोल्ड अंदाजाचीच सगळीकडे चर्चा रंगली आहे. ती या फोटोत खूपच हॉट दिसत असल्याचे तिचे फॅन्स तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. तसेच या फोटोत निकने ब्लँक रंगाचा कोट घातला असून त्याचा हा हँडसम अंदाज त्याच्या फॅन्सना भावत आहे.

प्रियंकाचा बोल्ड अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल. सोशल मीडियावर प्रियंकाचे व्हायरल झालेले हे फोटो अतिशय हॉट आणि बोल्ड अंदाजातले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांच्या नजरा हटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तिच्या या फोटोंना खूप सारे लाईक्स आणि कमेंटस पाहायला मिळत आहेत.

टॅग्स :प्रियंका चोप्रा