Join us

प्रियंका चोप्रा आणि निक जोनासचा लंडनच्या रस्त्यावर रोमँटिक डान्स, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 16:21 IST

प्रियंका चोप्रा आणि निक जोनसचा एक खास व्हिडिओ समोर आला आहे.

Priyanka-Nick Dance on London Streets: 'ग्लोबल आयकॉन' प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक  जोनास (Nick Jonas ) या दोघांची जोडी खूप क्यूट आहे. ते चाहत्यांना कायम कपल गोल्स देत असतात.  या जोडीचे वैयक्तिक आयुष्य नेहमी चर्चेत असतं. हे जोडपे पुन्हा एकदा त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीमुळे चर्चेत आहे. निक जोनासने अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं प्रियंका चोप्राच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.

नुकतंच प्रियंका आणि निक जोनस हे लंडनमध्ये 'हेड्स ऑफ स्टेट' चित्रपटाच्या प्रीमियरला पाहचले. या प्रिमिअरच्या आधी दोघे लंडनच्या रस्त्यावर सुंदर डान्स करताना दिसले.  समोर आलेल्या व्हिडीओत पुन्हा एकदा दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. यावेळी प्रियंका ही फ्रिंज मॅक्सी ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. तर निक हा नेहमीप्रमाणे स्टायलिश दिसत होता. दोघांचा हा गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रियांकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिचा आज २ जुलै २०२५ रोजी अमेझॉन प्राइम व्हिडीओवर 'हेड्स ऑफ स्टेट' हा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अ‍ॅक्शन-कॉमेडी असलेल्या या चित्रपटामध्ये प्रियकांना जॉन सीना आणि  इद्रिस एल्बा यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे. 'हेड्स ऑफ स्टेट'मध्ये जॉन सीना हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भूमिकेत तर  इद्रिस एल्बा ब्रिटनच्या पंतप्रधानांची भूमिकेत आहे. तर प्रियंकानं MI6 एजंट नोएल बिसेट ही भुमिका साकारली आहे. 'हेड्स ऑफ स्टेट'शिवाय, प्रियंका 'द ब्लफ' चित्रपटातही दिसणार आहे. तसेच, तिच्या हिट वेब सिरीज 'सिटाडेल'चा सीझन २ देखील लवकरच येत आहे, जो अमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होईल.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास