Join us

प्रियंका चोपडाने चक्क मध्यरात्री केला रणवीर सिंगला व्हिडीओ कॉल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 20:04 IST

प्रियंका चोपडा आणि रणवीर सिंगची मैत्री सर्वश्रुत आहे. हे दोघेही चांगले मित्र असून, शक्य होईल तेव्हा ते एकमेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असतात.

देसी गर्ल प्रियंका चोपडा आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे. सध्या प्रियंका विदेशात ‘क्वांटिको’ या मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र अशातही ती आपला जवळचा मित्र रणवीर सिंगसोबत वेळात वेळ काढून बोलणे पसंत करीत आहे. नुकतेच प्रियंकाने आपल्या मित्राला सरप्राइज देण्यासाठी चक्क मध्यरात्री व्हिडीओ कॉल केला. रणवीर सध्या त्याच्या आगामी ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रियंकाने ज्यावेळी रणवीरला कॉल केला, तेव्हा तो त्याच्या कारमध्ये बसलेला होता. शिवाय चित्रपटाच्या पुढच्या सीनची तयारी करीत होता. रणवीर प्रियंकाचा व्हिडीओ कॉल बघताच लगेचच रिसिव्ह केला अन् तिच्याशी काही वेळ बोलला. वास्तविक प्रियंकाने रणवीरला इन्स्टाग्रामवरील लाइव्ह चॅटमध्ये जॉइन होण्यासाठी व्हिडीओ कॉल केला होता. प्रियंका चोपडाने तिच्या आॅफिशियल ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘धन्यवाद रणवीर सिंग, तू खरोखरच एक रॉकस्टार आहेस. तुझ्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त दिला गेलेला संदेश खूपच महत्त्वपूर्ण आहे.’ व्हिडीओमध्ये प्रियंका रणवीरला प्रश्न विचारताना बघावयास मिळत आहे. ती रणवीरला विचारते की, तू जागतिक महिला दिनानिमित्त स्पेशल काय करणार आहेस आणि तू काय परिधान केले आहे? रणवीर प्रियंकाचे प्रश्नाचे उत्तर देताना म्हणतो की, ‘मी ग्रीन कलरचा स्कर्ट घातला आहे. मी कालच सेटवर सर्वांना सांगितले होते की, महिला दिनानिमित्त सर्वांनी स्कर्ट घालून यायचे आहे. सर्वांनी म्हणजेच सर्वांनी. विशेष म्हणजे हे सांगत असताना मी स्पॉट बॉयलादेखील स्कर्ट घालण्यास सांगितले होते.  पुढे प्रियंका चोपडा म्हणते की, ‘या अगोदरही आम्ही लोकांनी तुला स्कर्टमध्ये बघितले आहे. बाजीराव मस्तानी या चित्रपटावेळी तू एक लॉन्ग स्कर्ट घातला होता, मेन वियर स्कर्ट’ यावर रणवीर म्हणतो की, ‘होय, तुझी आठवण येत आहे. लवकर भारतात ये, तुझ्याशी बोलून मला आनंद वाटला.’ यावर प्रियंका म्हणते की, ‘होय, रन्नो, माझ्याकडे एक प्लॅन आहे.’