Join us

कलिजा खल्लास करणा-या प्रिया प्रकाशचा लिपलॉक व्हिडीओ, पाहून व्हाल लोटपोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 15:40 IST

आपल्या अदांनी तरूणाईला ‘दिवाणं’ करून सोडणारी अभिनेत्री प्रिया प्रकाशचा हा व्हिडीओ एकदा पाहाच

ठळक मुद्देप्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे.  डान्स आणि भटकंती हे तिचे आवडते छंद आहेत.

नजरेने बाण मारणारी ‘विंक गर्ल’ पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय, इंटरनेट सेन्सेशन मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर ही लाखो हृदयांवर राज्य करते. लाखो चाहते तिच्या एका लूकसाठी आतूर असतात. याच ‘विंक गर्ल’च्या एका नव्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.व्हिडीओत प्रिया प्रकाश सिनु सिद्धार्थला किस करू इच्छिते. पण सिनु मात्र तिच्या या इच्छेवर पाणी फेरतो. या मजेदार व्हिडीओतील सिनू सिद्धार्थ हा एक सिनेमेटाग्राफर आहे. सिनूसोबत प्रिया एक रोमॅन्टिक सीन क्रिएट करताना दिसतेय. सुरुवातीला दोघेही एकमेकांकडे पाहून हसतात. यानंतर दोघेही किस करण्यासाठी एकमेकांच्या जवळ येतात. पण सिनु प्रियाच्या इच्छेवर पाणी फेरतो. ते कसे हे व्हिडीओ पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल.

हा प्रँक व्हिडीओ आत्तापर्यंत 15 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. प्रिया व सिनु सिद्धार्थ दोघेही चांगले मित्र आहेत. ‘ओरू अदार लव’ या चित्रपटातही दोघांनी एकत्र काम केले होते. ‘श्रीदेवी बंगलो’ या चित्रपटातही दोघे एकत्र काम करताहेत.

‘ओरू अदार लव’या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या एका क्लिपने प्रिया प्रकाशला एका रात्रीत स्टार बनवले होते. ही क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली होती की, एकाच दिवसांत प्रियाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सहा लाखांवर पोहोचली होती.

या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनवले होती. या क्लिपमध्ये प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’ रोमान्स करताना दिसली होती. प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे.  डान्स आणि भटकंती हे तिचे आवडते छंद आहेत. बी कॉम फर्स्ट ईअरची विद्याथीर्नी असलेली प्रिया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. 

टॅग्स :प्रिया वारियर