बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आपल्या प्रग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. पती आरजे अनमोलसोबत ती खारमध्ये एका क्लिनिक बाहेर दिसली. यावेळी अमृताचा बेबी बम्प स्पष्ट दिसला. अमृताने सांगितले की, प्रेग्नंसी दरम्यान पती अनमोल तिची कशी काळजी घेतो आहे.
मुंबई मिररशी बोलताना अमृता राव म्हणाली, ''माझे जे मनं होते ते मी खातो आणि मला असे वाटते की बेबीसुद्धा यात खूपच आनंदी आहे.'' अमृता पुढे म्हणाली की, सध्या पती आरजे अनमोल घरातून काम करतेय, त्यामुळे तो तिची काळजी घेतोय. तो अमृतासोबत वेळ स्पेंड करतोय. अभिनेत्रीने सांगितले की अनमोल माझ्यासाठी आणि बाळासाठी रोज एक भगवद् गीतेचा अध्याय वाचतोय. अमृता सध्या आपली प्रग्नेंन्सी एन्जॉय करते आहे. अमृता लॉकडाऊनच्या आधी पासून प्रग्नेंट आहे.
2016मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले. लग्नापूर्वी अमृता व अनमोल 7 वर्षे डेटींग करत होते. अर्थात अमृताने हे सगळे दडवून ठेवले. अमृता व अनमोलची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली होती. या मुलाखतीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी अनमोलला डेंग्यू झाला होता. याचदरम्यान दोघांची मैत्री प्रेमात बदलली.
PHOTOS: अमृता रावने 7 वर्षे डेट केल्यानंतर केलं आरजे अनमोलशी लग्न, लवकरच देणार आहे गुड न्यूज!