Join us

प्रकाश राजने शेतकरी आंदोलनाला दर्शवला पाठिंबा, ग्रेटा थनबर्गचे ट्वीट केले रि-ट्वीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 18:28 IST

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

ठळक मुद्देप्रकाश राजने ग्रेटाचे ट्वीट रि-ट्वीट करत शेतकरी आंदोलनाला त्याचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. 

दिल्लीच्या सीमेवर अनेक दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने पाठिंबा दर्शवला होता. या आंदोलनाच्या समर्थनार्थ तिने ट्वीट केल्यानंतर तिच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी केस दाखल केली होती. पण त्यानंतरही ग्रेटाने एक ट्वीट केले होते. 

ग्रेटाने तिच्या पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, 'मी शेतकऱ्यांसोबत उभी आहे. शेतकऱ्यांकडून सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. कोणत्याही प्रकारच्या द्वेषभावना, धमक्या, मानवाधिकारांचं उल्लंघन ही गोष्ट बदलू शकत नाही,' असं ग्रेटानं ट्विटमध्ये म्हटलं होते. आता ग्रेटाला प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी पाठिंबा दर्शवला आहे. प्रकाश राजने ग्रेटाचे ट्वीट रि-ट्वीट करत शेतकरी आंदोलनाला त्याचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. 

पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणारं ट्विट केले होते. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे आम्ही एकजुटीनं उभे आहोत, असं ग्रेटाने ट्विटमध्ये म्हटले होते. ग्रेटाने दुसऱ्या एका ट्विटमध्ये एक डॉक्युमेंट शेअर केले होते. त्यामध्ये भारत सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यासाठीची रणनीती नमूद करण्यात आली होती. भारतावर पाच टप्प्यांमध्ये दबाव करण्याचा उल्लेख यामध्ये होता. ग्रेटाने हे ट्विट थोड्या वेळात डिलीट केले होते. 

जुने ट्वीट डिलीट केल्यानंतर ग्रेटाने एक अपडेटेड टूलकिट शेअर केले होते. या नव्या टूलकिटमध्ये अनेक बदल केले होते. २६ जानेवारीला भारतासह परदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची योजना यामधून हटवण्यात आली होती. 'जर तुमची मदत करण्याची इच्छा असेल तर हे अपडेटेड टूलकिट आहे. मागील डॉक्युमेंट मी हटवलं आहे. कारण ते जुनं होतं,' असे ग्रेटाने नव्या टूलकिटसोबतच्या ट्विटमध्ये म्हटले होते.

टॅग्स :प्रकाश राजशेतकरी आंदोलन