Join us  

काय सांगता, एका ट्विटसाठी पॉप सिंगर रिहानाला मिळाले इतके कोटी, कंगणा राणौतचा पुन्हा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 6:29 PM

रिहानाने भारतातील शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटला सर्वाधिक रिट्विट मिळाले आहेत. म्हणजे, जानेवारी 2021 पासून ते आजतायागय म्हणजे 5 फेब्रुवारीपर्यंतचं तिचं ते सर्वात सुपरहीट ट्विट ठरलंय.

सुरुवातीपासूनच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंजाबी गायक, अभिनेता यांनीही या आंदोलनाच्या समर्थनार्थ सहभाग घेतला होता. आता, हॉलिवूडची गायक रिहाना हिनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केल्याने ती अचानक चर्चेत आली. रिहानाच्या ट्विटनंतर शेतकरी आंदोलनाची जगभर चर्चा होत असल्याचं दिसून येत आहे. मात्र, रिहानाच्या ट्विटनंतर आता तिच्या फॉलोवर्सचीच चर्चा रंगली आहे.

कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ट्विटरवरील फॉलोवर्सच्या तुलनेत रिहाना एक पाऊल पुढेच आहे. सचिन तेंडुलकरपासून रोहित शर्मापर्यंत आणि अक्षय कुमारपासून अजय देवगणपर्यंत दिग्गजांनी रिहानाला ट्विटरवरुन सुनावले, त्यामुळे देशात रिहानाच्या ट्विटची आणखीनच चर्चा रंगली. रिहानाविषयी आणखी एका गोष्टीची चर्चा ऐकायला मिळत आहे. ते म्हणजे रिहाना एका ट्विटमुळे मालामाल झाली आहे.

द प्रिंटच्या वृत्तानुसार, स्काइरॉकेट नावाच्या पीआर कंपनीने पॉपस्टार रिहाना यांना शेतकरी चळवळीच्या बाजूने ट्वीट करण्यासाठी २.५ मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 18 कोटी रुपये आहे. रिहानेच आंदोलनावर ट्विट करणे अनेकांनी रुचले नाही. पण रिहानाचे ट्विट करणे हा एक रचलेला कट होता.

 

रिहानाने भारतीय शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्यानंतर ग्रेटानेही त्याचं समर्थन केलं होतं. त्यानंतर सगळ्या गोष्टी समोर आल्या होत्या. ज्या संस्था या विषयी काम करत होत्या त्यांची नावंही समोर आली आहेत. सोशल मीडियावर या प्लॅनिंगचा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनही व्हायरल झालं आहे.

 

रिहानाच्या गेल्या वर्षभरातील ट्विटचा अभ्यास केल्यास, रिहानाने भारतातील शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटला सर्वाधिक रिट्विट मिळाले आहेत. म्हणजे, जानेवारी 2021 पासून ते आजतायागय म्हणजे 5 फेब्रुवारीपर्यंतचं तिचं ते सर्वात सुपरहीट ट्विट ठरलंय.शेतकरी आंदोलनासंदर्भात रिहानाने केलेल्या ट्विटला, 3 दिवसांतच 3 लाख 41 हजार 900 रिट्विट मिळाले आहेत. तर, 8 लाख 42 हजार लाईक्सचा पाऊस पडलाय. 1 लाख 55 हजार नेटीझन्सने त्यावर कमेंट केल्या आहेत. 

टॅग्स :रिहानाकंगना राणौत