Join us  

हा आहे पूनम ढिल्लोनचा मुलगा, भन्साळींच्या चित्रपटातून करतोय डेब्यू!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 8:16 AM

रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांच्यानंतर संजय लीला भन्साळी आणखी एका स्टारकिडला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहेत.

रणबीर कपूर आणि सोनम कपूर यांच्यानंतर संजय लीला भन्साळी आणखी एका स्टारकिडला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहेत. होय, ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लोन आणि अशोक ठकेरिया यांचा मुलगा अनमोल भन्साळींच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यास तयार आहे. भन्साळींचा हा चित्रपट आधीच फ्लोरवर आला आहे.

Tuesdays And Fridays असे या चित्रपटाचे नाव असल्याचे कळते. लंडनमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. या चित्रपटासाठी अनमोलला साईन करण्यात आल्याची खबर आहे. भन्साळी लवकरचं अनमोलच्या डेब्यूची घोषणा करणार करतील, असे समजतेय. या चित्रपटासाठी भन्साळींनी टी-सीरिजसोबत हातमिळवणी केली आहे.आपल्या या पहिल्यावहिल्या चित्रपटात अनमोल एका खास लूकमध्ये दिसणार आहे. मॉडेलिंग क्षेत्रात त्याने स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली आहे. आता अनमोल मोठ्या पडद्याचा आणि भन्साळींच्या बॅनरचा कसा फायदा करून घेतो, ते बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.एका टीव्ही शोमध्ये पूनम यांनी मुलाच्या अभिनयातील पर्दापणाबद्दल भाष्य केले होते. मुलांनी वयाच्या २४ व्या वर्षांआधी आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात करू नये,असे मला वाटते.कारण पडद्यावर भाव प्रकट करण्यासाठी प्रगल्भतेची गरज असते, असे पूनम ढिल्लो म्हणाल्या होत्या. कदाचित अनमोल यादृष्टीने अगदी तयार आहे, असेच आपण समजायला हवे.

टॅग्स :पुनम ढिल्लो