Join us  

पूजा बत्रामुळे या ‘हिरो’ला मिळायची बॉलिवूड पार्ट्यांमध्ये एन्ट्री, आज आहे सुपरस्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 8:00 AM

‘विरासत’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री पूजा बत्राने नुकतेच अभिनेता नवाब शाहसोबत लग्न केले. आज पूजाचा वाढदिवस.

ठळक मुद्देयावर्षी 4 जुलैला पूजाने अभिनेता नवाब शाहसोबत गुपचूप लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.   

‘विरासत’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री पूजा बत्राने नुकतेच अभिनेता नवाब शाहसोबत लग्न केले. हे पूजाचे दुसरे लग्न. सध्या पूजा व नवाब त्यांच्या रोमॅन्टिक लाईफमध्ये आनंदी आहेत. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे, आज पूजाचा वाढदिवस.

 उत्तरप्रदेशमधील फैजाबादमध्ये जन्मलेल्या पूजाने 1993 साली मिस इंडियाचा किताब जिंकला होता. यानंतर पूजा मॉडेलिंगमध्ये आली आणि नंतर बॉलिवूडमध्ये. तिचे ‘विरासत’ व अन्य काही चित्रपट हिट झालेत. पण याऊपरही तिला म्हणावे तसे यश मिळू शकले नाही. फिल्मी करिअरपेक्षा तिचे लव्ह लाईफच जास्त गाजले.

अक्षय कुमार व पूजाचे अफेअर सर्वाधिक गाजले. 90 च्या दशकात या अफेअरच्या चर्चा सर्वत्र होत्या. विशेष म्हणजे तेव्हा अक्षय कुमारला इंडस्ट्रीत कुणीही ओळखत नव्हते. मॉडलिंगच्या दिवसात अक्षय व पूजाची ओळख झाली होती. असे ही म्हटले जाते कि बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये पूजा बत्रामुळे अक्षय कुमारला एंट्री मिळायची. आज अक्षय बॉलिवूडच्या पार्ट्यांना जात नाही. पण स्ट्रगलच्या काळात अक्षयने पूजासोबत पार्ट्यांना जाणे सुरु केले आणि इंडस्ट्रीतील अनेकांशी ओळख वाढवली.

  अक्षय आणि पूजाचे अफेअर जास्त काळ टिकले नाही. अक्षयपासून वेगळे झाल्यानंतर 2002 मध्ये पूजाने   सर्जन   सोनू आहलूवालियासोबत लग्न केले. मात्र लग्नाच्या 9 वर्षांनंतर पूजाने सोनूपासून घटस्फोट घेतला. पूजा आई बनायला तयार नव्हती, याचमुळे पतीसोबत तिचे मतभेद निर्माण झाले आणि पुढे तिने घटस्फोट घेतला.

यानंतर पूजा एक नायझेरियन युवकाला डेट करत असल्याच्या बातम्या रंगल्या. 2016 मध्ये खुद्द पूजा या अफेअरबद्दल बोलली होती. अर्थात हे नातेही फार काळ चालले नाही.

यावर्षी 4 जुलैला पूजाने अभिनेता नवाब शाहसोबत गुपचूप लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.    

टॅग्स :पूजा बत्राअक्षय कुमार