सध्या 'बॉर्डर २'चं शूटिंग सुरु आहे. या सिनेमात सनी देओल पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत आहे. या सिनेमात सनीसोबत दिलजीत दोसांझ, वरुण धवन हे कलाकार दिसत आहेत. या सिनेमात सनी देओल जी भूमिका साकारतोय त्या भागाचं शूटिंग संपलं आहे. सनीने त्यासंदर्भातील एक फोटो पोस्ट केला होता. त्यावेळी सनीच्या बाजूला '९१९ नंबर'चा खांब दिसला. या खांबाचं ऐतिहासिक महत्व आहे. इतकंच नव्हे, भारत-पाकिस्तान देशासाठी हा खांब महत्वाचा आहे. जाणून घ्या ही खास कहाणी
पिलर नंबर ९१८ चा अर्थ काय?
जम्मू आणि पाकिस्तानच्या सीमारेषेवर या दोन देशांबद्दलच्या अनेक कथा ऐकल्या जातात. ही कहाणीही अशीच, जम्मूतील भारत-पाक या देशांना जोडणाऱ्या आंतरराष्ट्रीय सीमेवर ९१९ क्रमांकाचा सीमास्तंभ आहे. यालाच 'पिलर नंबर ९१९' असंही म्हणतात. हे एक पिंपळाचं झाड आहे. या झाडाने नकळतपणे भारत-पाक देशाच्या बॉर्डरचं रुप घेतलं आहे.
कुठे आहे ही जागा?
ही जागा जम्मूच्या सुचेतगढ पोस्टवर आहे. या जागेवर आधी भारत-पाकिस्तानची बॉर्डर होती. या ठिकाणी पिंपळाचं झाड उगवलं. काही वर्षांत झाड मोठं झालं आणि त्या झाडाने बॉर्डरवर असलेल्या सीमास्तंभाला व्यापून टाकलं. आज हे झाडच ‘पिलर ९१९’ म्हणून ओळखलं जातं. विशेष म्हणजे, झाडाची एक फांदी भारतात तर दुसरी फांदी पाकिस्तानच्या हद्दीत आहे. त्यामुळे हे झाड दोन्ही देशांमध्ये विभागलेलं आहे.
हे झाड आता शांततेचं प्रतीक मानलं जातं. BSF आणि पाकिस्तानी रेंजर्स दोघेही या झाडाला हात लावत नाहीत. हे झाड ना कोणी तोडतं, ना कापतं.. कारण दोन्ही देशांच्या जवानांमध्ये या झाडाबद्दल एक प्रकारचा आदर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. हे झाड फक्त एक दोन देशांमधली बॉर्डर दर्शवत नाही, तर निसर्ग मानवाने आखलेल्या सीमांना पार करू शकतो, हेही दाखवतो. हेच झाड 'बॉर्डर २' या सनी देओलच्या आगामी सिनेमात झळकले आहे, आणि त्यामुळे ही जागा पुन्हा चर्चेत आली आहे.