Join us

Photoshoot:अनुषा दांडेकरचा हॉट अंदाज तुम्हालाही वेड लावेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 10:33 IST

प्रसिद्ध एमटीव्ही व्हीजे अनुषा दांडेकरचा हॉट अंदाज समोर आला आहे. फिटलूक नावाच्या एका मॅगझिनसाठी अनुषानं हॉट फोटोशूट केलं आहे. ...

प्रसिद्ध एमटीव्ही व्हीजे अनुषा दांडेकरचा हॉट अंदाज समोर आला आहे. फिटलूक नावाच्या एका मॅगझिनसाठी अनुषानं हॉट फोटोशूट केलं आहे. जुलै महिन्याच्या मॅगझिनच्या कव्हरवर अनुषा झळकली आहे. यांत अनुषाचा हॉट एंड बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. कव्हरपेजवरील फोटोंसोबत इतर फोटोतही अनुषाचा अंदाज तितकीच लक्षवेधी ठरत आहे.या फोटोंमध्ये अनुषाचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. परफेक्ट लूक, परफेक्ट बॉडी शेप, तितकाच परफेक्ट एटिट्यूड आणि चेह-यावरील बोलके हावभाव या यामुळे अनुषाच्या या फोटोंना चारचाँद लागले आहेत. एका फोटोत अनुषा बिकीनी परिधान करुन बीचवर बसल्याचं पाहायला मिळत आहे. दुस-या एका फोटोत खुल्या सोडलेल्या केसांमध्ये अनुषा तितकीच सेक्सी आणि हॉट दिसत आहे.प्रत्येक फोटोची खासियत म्हणजे अनुषाची घायाळ करणा-या अदा. यामुळे अनुषाचं सौंदर्य आणखी खुलून गेले आहे. व्हीजे आणि टीव्ही अभिनेत्री असलेल्या अनुषाचे टीव्ही कलाकार करण कुंद्रासोबत अफेअर सुरु आहे.गेल्या दीड ते दोन वर्षांपासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. एमटीव्हीचा प्रसिद्ध आणि चर्चित शो 'लव स्कूल-2' अनुषाने होस्ट केला होता.मध्यंतरी अनुषा तिच्या सोशल मीडियावरील फोटोमुळे चर्चेत आली होती.अनुषाने सोशल नेटवर्किंग साईट इन्स्टाग्रामवर आपला एक हॉट फोटो शेअर केला होता. ब्लॅक एंड व्हाईट रुपात असलेल्या या फोटोला तिने कॅप्शनही दिले होते. “माझं शरीर, माझी आवड, माझं जीवन आणि माझं कर्म... स्वतःला लोकांच्या मतांपासून मुक्त करा” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं होतं. यांत तिने आपला बॉयफ्रेंड करण कुंद्राचाही उल्लेख केला होता. यानंतर या फोटोला ब-याच कमेंट आल्या. यातील बहुतांशी कमेंट या निगेटिव्हच होत्या.या निगेटिव्ह कमेंट पाहून खुद्द करणला उत्तर दयावे लागले होते.