Join us
Daily Top 2Weekly Top 5

​भारती सिंग व हर्ष लिंबाचियाच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटो आहेत खास...हसून हसून दुखेल पोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 15:13 IST

आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवणारी कॉमेडियन भारती सिंग लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेन्ड हर्ष लिंबाचियासोबत येत्या ३ डिसेंबरला ...

आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवणारी कॉमेडियन भारती सिंग लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. बॉयफ्रेन्ड हर्ष लिंबाचियासोबत येत्या ३ डिसेंबरला ती लग्नगाठ बांधणार आहे. गोव्यात हा ग्रॅण्ड लग्नसोहळा होणार आहे. साहजिक भारती व हर्षच्या या लग्नसोहळ्याचे इनसाईड फोटो पाहायला चाहते उत्सूक आहेत. पण त्याआधी या दोघांच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. विशेष म्हणजे, भारतीच्या प्री-वेडिंग फोटोशूटचे हे फोटोही खळखळून हसवणारे आहे. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच भारतीने इथेही आपल्या चाहत्यांना हसवण्याची संधी सोडलेली नाही.एका फोटोत भारतीने हर्षला थेट खांद्यावर घेतले आहे. तिच्या या फोटोतील पोझ ‘ दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’च्या पोस्टरची आठवण करून देणारी आहे. विशेष म्हणजे, या फोटोला ‘ दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे’च्या धर्तीवर ‘दुल्हा हम ले जायेंगे’ असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे.दुस-या फोटोत भारती व हर्ष दोघेही लग्नाची तारीख सांगत आहेत. सेव्ह द डेट, असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले आहे. तिसरा फोटोही मजेशीर आहे. यात हर्षने भारतीला लहान मुलासारखे गुडघ्यांवर घेतले आहे. हा फोटो शेअर करताना भारतीने अतिशय सुंदर कॅप्शन दिले आहे. त्याने माझे हृदय चोरले आता मी त्याचे आडनाव चोरणार, असे तिने लिहिलेय.ALSO READ: ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंहच्या लग्नात थिरकणार सनी लिओनी?अन्य एक फोटो मात्र युनिक आहे.अगदी रोमॅन्टिक़ होय, या फोटोत भारती व हर्ष दोघांनी अतिशय रोमॅन्टिक पोज दिली आहे. दोघेही या फोटोत अतिशय सुंदर दिसताहेत. भारती व हर्ष दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. लग्नानंतर हे कपल युरोपमध्ये हनीमूनला जाणार आहे. दोघेही २० ते २५ दिवस युरोपातील वेगवेगळ्या शहरात फिरणार आहेत. भारतीच्या गेस्ट लिस्टमध्ये शाहरुख खान, सलमान खान, करण जौहर, माधुरी दीक्षित, मलाईका अरोरा यांसारख्या सेलिब्रिंटींची नावे आहेत. या सगळ्यांना भारती स्वत: जाऊन आमंत्रणं देणार आहे. भारती गेल्या आठ वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. त्यामुळे तिने लग्नानंतरचा काही काळ केवळ तिच्या पतीसोबत घालवायचा ठरवला आहे. लग्नानंतर एक महिन्यांनी म्हणजेच जानेवारीत ती पुन्हा काम करायला सुरुवात करणार आहे.