Join us

जान्हवीचा बॉयफ्रेंडला किस करीत असल्याचा फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 14:51 IST

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने अजून बॉलिवडमध्ये एन्ट्री केली नाही. परंतु, ती लवकरच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या ग्लॅमर लूकसोबत पाय ठेवणार ...

श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरने अजून बॉलिवडमध्ये एन्ट्री केली नाही. परंतु, ती लवकरच फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या ग्लॅमर लूकसोबत पाय ठेवणार असल्याची चर्चा आहे. याबरोबर तिचा एक फोटो व्हायरल झाला असून, ती ब्रॉयफ्रेंड  शिखर पहारिया सोबत पार्टीमध्ये किस करीत असल्याचे दिसत आहे. यामध्ये जान्हवी आपला बॉयफ्रेंड शिखर पहारियाच्या अगदी जवळ उभी आहे. दोघेही यामध्ये लिप लॉक करीत असल्याचेही दिसत आहेत. शिखर हा वीर पहारियाचा भाऊ आहे. तो अलीकडेच फोटोमध्ये सैफ अली खानची मुलगी सारा  खान सोबत दिसला होता. ते  दोघे एकमेकांना डेट करीत असल्याचीही चर्चा होती. जान्हवी ही महेश बाबू बरोबर क्षेत्रीय भाषाच्या चित्रपटात प्रवेश करीत असल्याचीही चर्चा आहे.  इंस्टाग्रामवर सक्रीय असणाºया जान्हवीचे चाहत्यांना ती लवकरात लवकर बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याची प्रतीक्षा आहे.