Join us

​पत्रकार सोनाक्षीने शेअर केला ‘नूर’चा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2016 20:11 IST

न्यूज अँकरच्या व अनेकांना त्रासून सोडणारे प्रश्न विचारताना दिसणार आहे.

बॉलिवूडची ‘दंबग बाला’ सोनाक्षी सिन्हा आता नव्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ‘अकिरा’ व ‘फोर्स 2’मध्ये अ‍ॅक्शन करणारी सोनाक्षी सिन्हा ‘नूर’ या चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनाक्षीने सोशल मीडियाहून या चित्रपटाचे फोटो शेअर केला असून हा चित्रपट  पुढील वर्षी 21 एप्रिलला रिलीज करण्यात येणार आहे. नोटबंदीमुळे सोनाक्षी सिन्हाची प्रमुख भूमिका असलेला ‘फोर्स 2’ला चांगली ओपनिंग मिळू शकली नाही, मात्र आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर 21 कोटींचा गल्ला जमविला आहे. यात सोनाक्षीने रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. ‘नूर’ या चित्रपटात सोनाक्षी न्यूज अँकरच्या व अनेकांना त्रासून सोडणारे प्रश्न विचारताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये ती संवेदनशील पत्रकाराच्या रूपात दिसेल. }}}} ">http://सोनाक्षीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवर ‘नूर’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख लिहण्यात आली आहे. सोबतच सोनाक्षीने या फोटोला कॅप्शन देताना लिहलेय, ‘ती सूर्यप्रकाशासारखी आहे, मात्र तिच्यात वादळ आहे, ती साधेपणापासून दूर आहे, पण ती खास नाही, ती प्रत्येक मुलगी आहे. ती नूर आहे, मी नूर आहे, ती लवकरच येतेय 21 एप्रिल 2017’. सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे अनेक अनेक रुपे दिसतात. सोनाक्षी सिन्हाचा हा चित्रपट पूर्वी ७ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट 21 एप्रिलला रिलीज होणार आहे. बाहुबली 2 याचवेळी रिलीज होणार असल्याने तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचे सांगण्यात येते. ‘नूर’मध्ये सोनाक्षी पाकिस्तानात झालेल्या स्फोटांचे वार्तांकण करताना दिसणार आहे. या दरम्यान ती आपल्या जोडीदाराचा शोधही घेताना दिसेल.  ">http://