Join us  

pathaan song Besharam Rang Troll:  हे काय? ‘बेशर्म रंग’ गाण्यातील दीपिकाचा डान्स पाहून चाहत्यांनी घेतली मजा, मीम्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 10:43 AM

pathaan song Besharam Rang Troll: शाहरूख खान व दीपिका पादुकोणच्या ‘पठान’ या सिनेमाचं पहिलं गाणं ‘बेशर्म रंग’ रिलीज झालं. सध्या हे गाणं वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे.

शाहरूख खान (Shahrukh Khan) व दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) ‘पठान’ या सिनेमाचं पहिलं गाणं ‘बेशर्म रंग’ रिलीज झालं. सध्या हे गाणं वेगवेगळ्या कारणानं चर्चेत आहे. गाण्यातील दीपिका पादुकोणच्या सेन्शुअल डान्स स्टेप्स पाहून लोक थक्क झालेत. अवघ्या एका दिवसांत या गाण्यानं जवळपास 5 मिलीअन व्ह्यूजचा टप्पा गाठला. पण सोबत हे गाणं जबरदस्त ट्रोलही झालं. सोशल मीडियावर या गाण्यावरचे असंख्य मीम्स व्हायरल होत आहेत.

‘बेशर्म रंग’मध्ये दीपिकाने एकापेक्षा एक बोल्ड पोझ दिल्या आहेत. या संपूर्ण गाण्यात दीपिकाने वेगवेगळ्या बिकिनी परिधान केल्या आहेत. तिच्या पॉवरफुल डान्सवर चाहते फिदा आहेत. पण एक हुक स्टेप पाहून चाहते दीपिका व कोरिओग्राफरची चांगलीच मजा घेत आहेत. दीपिका बेन्ड होऊन ... करते, त्या हुक स्टेपवरचे एक ना अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

दीपिका व शाहरूखचं हे गाणं कॉपी असल्याचा दावाही युजर्स करत आहेत. मकीबाच्या गाणं चोरल्याचा आरोप करत युजर्सनी त्यावरूनही मजा घेतली आहे. पुराव्या दाखल मकीबा गाणं अनेक जण शेअर करत आहेत. ही दोन्ही गाणी ऐकल्यावर तुम्हालाही त्यात साम्य दिसेल. दोन्ही गाण्यांचे बीट्स सेम वाटतात.

‘बेशर्म रंग’ हे 3 मिनिट 3 सेकंदाच गाणं युरोपमधल्या सुंदर लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलं आहे. दीपिका पदुकोणसोबत शाहरुख खान हाही या गाण्यात आपली मस्कुलर बॉडी फ्लॉन्ट करताना दिसतोय. हे गाणं शिल्पा रावने  गायलं आहे.

‘पठान’ चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

टॅग्स :पठाण सिनेमादीपिका पादुकोणशाहरुख खानबॉलिवूड