Join us  

Pathaan Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'पठाण'ची त्सुनामी, दुसऱ्या दिवशी तब्बल 70 कोटींची कमाई...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 9:47 AM

Pathaan Box Office Collection : अवघ्या दोन दिवसात चित्रपटाने भारतात 127 तर जगभरात 235 कोटींची कमाई केली आहे.

Pathaan Box Office Collection : याला म्हणतात बॉक्स ऑफिस त्सुनामी...पाच वर्षानंतर परतलेल्या किंग खानने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाने 'KGF-2'सह अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड तोडला आहेत. पहिल्या दिवशी सूमारे 57 कोटींची कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत कमालीची वाढ झाली. 'पठाण'ने दुसऱ्या दिवशी(दि. 26) तब्बल 70 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाच्या जबरदस्त कमाईने व्यापार विश्लेषकांही चकीत केले आहे. किंग खानच्या चित्रपटाने दोन दिवसांत 127 कोटींच्या आसपास गल्ला जमवला आहे.

सर्वत्र फक्त 'पठाण'चा डंकापहिल्या दिवशी भारतात 57 कोटींची बंपर ओपनिंग केल्यानंतर, दुसऱ्या दिवशीही पठाणचा डंका वाजला. पठाणला प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा चांगलाच फायदा झाला. ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या मते पठाणच्या हिंदी व्हर्जनने दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) 70 कोटींचा गल्ला जमवला आहे. पठाणच्या कमाईचा आकडा दोन दिवसांत 127 कोटींवर गेला आहे. दुसऱ्या दिवसाच्या कमाईत पठाणने KGF 2 वर मात केली आहे. KGF 2 च्या हिंदी व्हर्जनने दुसऱ्या दिवशी 47 कोटींची कमाई केली होती.

पठाणने अनेक विक्रम मोडीत काढलेपठाण दुसऱ्या दिवशी 60-65 कोटींपर्यंत मजल मारेल, असा अनेक विश्लेषकांनी अंदाज वर्तवला होता. पण या सगळ्या अपेक्षांच्या पुढे जाऊन पठाणने जबरदस्त कमाई केली. पठाणचा डंका देश-विदेशात वाजत आहे. विशेष म्हणजे, पठाणने अवघ्या दोन दिवसांतच जगभरातील बॉक्स ऑफिसवर 235 कोटींची कमाई केल्याचेही रमेश बाला यांनी ट्विटरवरुन सांगितले.

बॉक्स ऑफिस मालामालशाहरुख खान पठाणसोबत तब्बल 4 वर्षांनी रुपेरी पडद्यावर परतला आहे. ग्लॅमर, अॅक्शन, थ्रिल, सस्पेन्स... हे सर्व पठाणमध्ये आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांचा याला जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. एकंदरीतच पठाणने शाहरुखला पुन्हा एकदा बॉलिवूडचा 'किंग' बनवले हे. कोरोनानंतर एवढी कमाई करमारा पठाण पहिलाच बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. पठाणचे ओपनिंग वीकेंड कलेक्शन किती होईल, हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानदीपिका पादुकोणजॉन अब्राहमबॉलिवूड