Join us  

Pathaan Box Office Collection Day 5: यालाच म्हणतात किंगखान! ‘पठाण’ची छप्परफाड कमाई, पाचव्या दिवशी कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 10:19 AM

Pathaan Box Office Collection Day 5: बॉलिवूड किंग शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट नॉनस्टॉप कमाई करतोय. काल रविवारी शाहरूखच्या या चित्रपटाने बंपर कमाई केली.

Pathaan Box Office Collection Day 5: बॉलिवूड किंग शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट नॉनस्टॉप कमाई करतोय. दरदिवशी कमाईचा नवा रेकॉर्ड बनवणाऱ्या ‘पठाण’च्या ओपनिंग वीकेंडचे आकडे समोर आले आहेत आणि हे आकडे सुखावणारे आहेत.  होय, काल रविवारी शाहरूखच्या या चित्रपटाने बंपर कमाई केली.ट्रेड ॲनालिस्ट रमेश बाला यांनी ‘पठाण’च्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. त्यानुसार, या चित्रपटाने रविवारी देशात ७० कोटींची कमाई केली. याचसोबत कमाईचा आकडा २८२ कोटींवर पोहोचला आहे. 

‘पठाण’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ५५ कोटींची विक्रमी कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ६८ कोटींची गल्ला जमवला. तिसऱ्या दिवशी ‘पठाण’च्या कमाईत थोडी घसरण पाहायला मिळाली. तिसऱ्या दिवशी या सिनेमाने ३८ कोटींचा बिझनेस केला. त्यानंतर चौथ्या दिवशी पठाणने ५१.५ कोटी तर पाचव्या दिवशीही म्हणजे काल रविववारी पाचव्या दिवशीने नेट ७० कोटींचा गल्ला जमवला. याचसोबत पाच दिवसांत या चित्रपटाने २८२ कोटींच्या जवळपास बिझनेस केला आहे. लवकरच ‘पठाण’ ३०० कोटींचा जादुई आकडा पार करणार आहे.

विदेशातही ‘पठाण’चाच बोलबाला  शाहरुखच्या ‘पठाण’ची जादू जगभरात पाहायला मिळत आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात ‘पठाण’चा डंका पाहायला मिळत आहे. पाच दिवसांत ‘पठाण’ चित्रपटाने जगभरात ५५० कोटींची कमाई केली आहे. शाहरूखसाठी हा आनंदाचा क्षण आहे. रविवारी किंगखानने मन्नत बाहेर उभ्या चाहत्यांना अनपेक्षित दर्शन देत, त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला.

मंडे टेस्ट पास करणार का?वीकेंड संपला आहे. आता ‘पठाण’साठी कसोटीचा क्षण आहे. गेल्या पाच दिवसांत ‘पठाण’ने डबल डिजिट कमाई केली आहे. वर्कींग डेजलाही कमाईचा हा वेग असाच कायम राहतो का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. जाणकारांच्या मते, किंगखानची जबरदस्त क्रेझ आहे. शिवाय सिनेप्रेमींसाठी चित्रपटगृहांत दुसरा कुठलाही मोठा सिनेमा नाहीये. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा ‘पठाण’च्या सोमवारच्या कमाईकडे लागल्या आहेत. 

टॅग्स :पठाण सिनेमाशाहरुख खानदीपिका पादुकोणबॉलिवूड