Join us

​‘पार्टनर’ बॉयला भेटून सलमान का झाला भावूक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 15:12 IST

सलमान खानचा एक ‘मुलगा’ आता बराच मोठा झालाय. काय? धक्का बसला ना? सलमान अद्याप बोहल्यावर चढला नसताना त्याचा मुलगा ...

सलमान खानचा एक ‘मुलगा’ आता बराच मोठा झालाय. काय? धक्का बसला ना? सलमान अद्याप बोहल्यावर चढला नसताना त्याचा मुलगा कुठून आला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देतोय. तर ऐका, सलमानचा हा मुलगा म्हणजे, ‘पार्टनर’मधला चिमुकला रोहन अर्थात अली हाजी. २००७ मध्ये आलेल्या सलमान व गोविंदाच्या ‘पार्टनर’ या चित्रपटात अली हाजीने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तो सलमानचा मुलगा बनला होता. या चिमुकल्याने आपल्या अभिनयाने सगळ्यांचीच मने जिंकली होती. सलमानही त्याच्या प्रेमात पडला होता. हाच चिमुकला अली हाजी आता १७ वर्षांचा झाला आहे. अलीकडे हाजी व सलमान परस्परांना भेटले. चिमुकला अली इतका मोठा झालेला पाहून यावेळी सलमान कमालीचा भावूक झाला. तितकाच अली सुद्धा आपल्या ‘रिल पापा’ला पाहून भावनिक झाला. ‘बिग बॉस’च्या लोणावळा सेटवर सलमान व हाजी एकत्र दिसले. या भावूक क्षणाचा एक फोटो अलीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.गेल्या नऊ वर्षांत सलमान जशाच्या तसा दिसत असला तरी अली मात्र कमालीचा बदलला असल्याचेच या फोटोवरून दिसते. अलीने ‘पार्टनर’सह ‘ता रा रम पम’,‘फना’ अशा अनेक चित्रपटात काम केलेय. सध्या तरी अलीने त्याचे सगळे लक्ष अभ्यासावर केंद्रीत केले आहे. पण शिक्षण पूर्ण झाल्यावर बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री करण्याचा त्याचा निर्णय पक्का आहे. सलमानप्रमाणेच त्यालाही मोठ्ठा स्टार व्हायचेयं. शेवटी रिअल लाईफ बाबा असो वा रिल लाईफ बाबा...मुलगा त्याच्याच पावलावर पाऊल टाकणार ना?