Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मालामाल वीकली'चाही येतोय दुसरा पार्ट? परेश रावल यांची प्रतिक्रिया; म्हणाले, "मी हा सिनेमा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 09:17 IST

२००६ साली आलेल्या 'मालामाल वीकली २'ने प्रेक्षकांना खळखळून हसवलं होतं.

दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या अनेक कॉमेडी सिनेमांपैकी एक म्हणजे 'मालामाल वीकली'. २००६ साली आलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एका गावातील अँथनी नावाच्या व्यक्तीला लॉटरी लागते आणि तो कोट्याधीश होतो. मात्र त्याला पराकोटीचा आनंद होतो आणि बसल्या जागीच त्याचा मृत्यू होतो. हळूहळू ही बातमी गावातील एकेका व्यक्तीला कळते आणि पुढे मजा सुरु होते. सिनेमाची कहाणी, कलाकारांचा अभिनय यामुळे तो प्रेक्षकांचा ऑल टाईम फेवरेट सिनेमा आहे. आजही टीव्हीवर हा सिनेमा लागला की आवर्जुन पाहिला जातो. सिनेमाचा सीक्वेल येणार अशी चर्चा काही दिवसांपूर्वी झाली होती. त्यावर आता परेश रावल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना परेश रावल यांना 'मालामाल वीकली'चा सीक्वेल येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, "हो ही बातमी खरी आहे. मी हा सिनेमा करतोय." तरी मेकर्सने अद्याप 'मालामाल वीकली २'बद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र आता दोन दशकांनंतर सिनेमाचा दुसरा भाग येणार असल्याने चाहते खूश झालेत.

दिग्दर्शक प्रियदर्शन सध्या 'हैवान' सिनेमावर काम करत आहेत. यामध्ये अक्षय कुमार, सैफ अली खान आणि परेश रावल यांची भूमिका आहे. शिवाय त्यांचा 'हेरा फेरी ३'ही चर्चेत आहेच. त्यामुळे 'मालामाल वीकली'च्या दुसऱ्या भागासाठी बरीच वाट पाहावी लागेल  असा अंदाज आहे. 

'मालामाल वीकली'मध्ये परेश रावल यांच्यासोबत परेश रावल, राजपाल यादव, ओम पुरी, रीमा सेन, असरानी, शक्ती कपूर, रसिका जोशी, अरबाज खान आणि रितेश देशमुखची भूमिका होती. सिनेमातील सर्वांच्याच अचूक कॉमिक टायमिंगने सर्वांना खळखळून हसवलं होतं.

English
हिंदी सारांश
Web Title : 'Malamaal Weekly 2' Confirmed? Paresh Rawal Reacts, Says, 'I Am Doing...'

Web Summary : Paresh Rawal confirms he's doing 'Malamaal Weekly 2,' sequel to the 2006 comedy hit. Official announcement awaited. Priyadarshan is currently busy with other projects, so release may be delayed.
टॅग्स :परेश रावलबॉलिवूड