Join us  

इंद्रायणी तांदळाचा भात, झणझणीत झुणका अन्..'; पंकज त्रिपाठीचं महाराष्ट्रप्रेम, आवडतात 'हे' पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 12:19 PM

Pankaj tripathi: पंकज त्रिपाठी यांनी अलिकडेच एका मुलाखतीमध्ये मुंबईतील काही आठवणी ताज्या केल्या.

'मिर्झापूर','सेक्रेड गेम' यांसारख्या गाजलेल्या वेबसीरिजमधून विशेष लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजे पंकज त्रिपाठी (Pankaj tripathi). नुकताच त्यांचा 'ओह माय गॉड 2' हा सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे सध्या ते चर्चेत आहेत. अलिकडेच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या स्ट्रगल काळावर भाष्य केली. यावेळी बोलत असताना त्यांनी त्यांचं महाराष्ट्रावरचं प्रेम दाखवलं. महाराष्ट्रातील कोणते पदार्थ त्यांना प्रचंड आवडतात आणि येथील लोक कसे आहेत हे सुद्धा त्याने सांगितलं.

पंकज त्रिपाठी यांनी अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना मुंबईतील काही आठवणी ताज्या केल्या. सोबतच मुंबईत कुठे फिरायला आवडतं, कोणते पदार्थ आवडतात हे सांगितलं.

 "मी घराबाहेर फारसं काही खात नाही. शुटिंग असेल तर त्यावेळी सेटवर खिचडी करुन खातो. त्यामुळे पोट हलकं राहतं. तसंच अगदी बाहेरचं खायची वेळ आली तर मी साऊथचे इडली, डोसा खातो. ते पदार्थ मला आवडतात. पण, त्याच्यासोबतच मला झुणका भाकरी सुद्धा खूप आवडते. पण, मुंबईत आता झुणका भाकरी मिळतच नाही. आता दुकानावर झुणका भाकरी केंद्र लिहिलं असतं पण, तिथे वडापाव मिळतो", असं ते म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "मला झुणका भाकरी खूप आवडते. त्यामुळे मला जर कधी झुणका भाकरी खायची इच्छा झाली तर मी माझा मित्र शिवराज चौहान यांच्याकडे जायचो. तो पुणे-वाई रस्त्यावर राहतो. मी बऱ्याचदा त्याच्या घरी झुणका भाकरी खाण्यासाठीच जातो. त्याच्या घरचं तूप, त्यांच्या शेतातला इंद्रायणी तांदळाचा भात आणि झुणका-भाकरी..व्वा.."

टॅग्स :पंकज त्रिपाठीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमामहाराष्ट्रमुंबई