Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धुरंधर २'च्या रिलीजआधीच संजय दत्तला पाकिस्तानातून मिळालं मोठं गिफ्ट, दिला गोल्ड प्लेटेड iPhone 17

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 16:10 IST

संजय दत्तला त्याच्या एका पाकिस्तानी चाहत्याने चक्क गोल्ड प्लेटेड आयफोन १७ गिफ्ट म्हणून दिला आहे. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे लाखो चाहते आहेत. केवळ भारतातच नाही तर परदेशातच संजय दत्तचे फॅन आहेत. आपल्या आवडत्या कलाकारासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. संजय दत्तच्याच एका चाहतीने तिची संपूर्ण संपत्ती अभिनेत्याच्या नावावर केली होती. पण, संजय दत्तने मोठेपणा दाखवत त्या संपत्तीवर अधिकार न दाखवता ती चाहतीच्या कुटुंबीयांना परत केली. आता संजय दत्तला त्याच्या एका पाकिस्तानी चाहत्याने चक्क गोल्ड प्लेटेड आयफोन १७ गिफ्ट म्हणून दिला आहे. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, संजय दत्तला त्याचा हा पाकिस्तानी चाहता दुबईत भेटला होता. तिथेच त्याने संजय दत्तला मोबाईल गिफ्ट केला. संजय दत्तचा हा चाहता पाकिस्तानातील इन्फ्लुएन्सर काशिफ झमीर आहे. संजय दत्त आणि त्याच्या चाहत्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये दिसतंय की पाकिस्तानी चाहता बॉक्समधून आयफोन काढून तो संजय दत्तला देतो. या गोल्ड प्लेटेड फोनवर मागच्या बाजूला संजय दत्त, नरगिस दत्त आणि सुनील दत्त यांचा फोटोही छापल्याचं दिसत आहे. "संजू बाबा" आणि "लव्ह" असं या फोनवर लिहलं आहे. या फोनची किंमत सुमारे १.५ ते २ लाखांच्या घरात आहे. 

दरम्यान, संजय दत्त 'धुरंधर २'मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'धुरंधर'मध्ये त्याने पाकिस्तानातील एसीपी चौधरी असलमची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना आवडली होती. 'धुरंधर २'मध्ये संजय दत्तचा पोलिसाच्या भूमिकेतील डॅशिंग अंदाज पाहायला मिळणार आहे. येत्या १९ मार्चला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Sanjay Dutt Receives Gold Plated iPhone 17 from Pakistani Fan

Web Summary : Before 'Dhurandhar 2' release, Sanjay Dutt received a gold-plated iPhone 17 as a gift from a Pakistani fan Kashif Zamir in Dubai. The phone has images of Sanjay, Nargis, and Sunil Dutt engraved on it and is estimated to cost ₹1.5-2 lakh. Dutt will appear in 'Dhurandhar 2' as a police officer.
टॅग्स :संजय दत्तधुरंधर सिनेमा