Join us  

"इथे PM बदलतात तशा पत्नीही..." पाक अभिनेत्रीचं विधान चर्चेत, म्हणाली, 'पाकिस्तानी नवरा नको'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 3:23 PM

अभिनेत्री म्हणाली, 'दुसऱ्या देशातील नवरा शोधेन...'

पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने (Shoaib Malik) अभिनेत्री सना जावेदसोबत निकाह करत सर्वांना धक्का दिला. शोएब तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. त्याची पहिली पत्नी आयेशा सिद्दीकी होती तर दुसऱ्यांदा तो भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झासोबत लग्नबंधनात अडकला होता. शोएबच्या विवाहबाह्य संबंधांमुळे सानियाने कंटाळून त्याच्यापासून खुला घेतला. आता नुकतंच एका पाकिस्तानी अभिनेत्रीने केलेलं विधान चर्चेत आहे. पाकिस्तानात पंतप्रधान बदलतात तशाच इथे पत्नीही बदलत राहतात असं ती म्हणाली आहे.

पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री सईदा इम्तियाजने (Saeeda Imtiaz) लग्नावर विधान केलं आहे. शोएबच्या तिसऱ्या लग्नानंतर तिचं हे विधान चर्चेत आहे. शोएबच्या नावाचा उल्लेख न करता ती म्हणाली, "पाकिस्तानची अवस्था पाहून मला नाही वाटत मी पाकिस्तानीसोबत लग्न करु शकेन. इथे एक नाही तर अनेक मुलींशी लग्न होतं. मी दुसऱ्या देशातील नवरा शोधेन.  इथे जसे पंतप्रधान बदलतात तसेच काही वर्षांनंतर पत्नीही बदलतात."

सईदाने कोणाचंही नाव न घेता ही पोस्ट केली. तरी तिचा इशारा शोएबने केलेल्या तिसऱ्या लग्नावर आहे हे स्पष्ट आहे. सईदाची पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. 'तू भारतीयशी लग्न कर. तेही सलमान खानसोबत.' तर काही जणांनी तिला म्हटलं आहे की,'प्रत्येक देशात असे पुरुष असतात'. 

शोएबने सना जावेदशी तिसरं लग्न केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. पाकिस्तानी लोकही शोएब नाही तर सानियालाच पाठिंबा देत आहेत. सानियाचा घटस्फोट सध्या दोन्ही देशात चर्चेचा मुद्दा बनला आहे.

टॅग्स :पाकिस्तानशोएब मलिकलग्नघटस्फोटसानिया मिर्झा