Join us
Daily Top 2Weekly Top 5

Oscar Awards 2026: प्रियांका चोप्राचा ऑस्करच्या रेड कार्पेटवर जलवा, निक जोनाससोबत लावली हजेरी, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 06:15 IST

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा प्रेझेंटर म्हणून झळणार आहे. प्रियांकाने पती निक जोनाससह ९८व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. 

Oscar Awards 2026: मनोरंजन विश्वातील अतिशय प्रतिष्ठित आणि मानाचा मानला जाणारा ९८वा अकादमी पुरस्कार सोहळा आज पार पडत आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ऑस्कर पुरस्कार सोहळा रंगला आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा प्रेझेंटर म्हणून झळणार आहे. प्रियांकाने पती निक जोनाससह ९८व्या अकादमी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. 

ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचा खास अंदाज पाहायला मिळाला. प्रियांकाने पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये या सोहळ्याला हजेरी लावली होती. तिच्या खास अंदाजाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. तर निक जोनास काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये जेन्टलमॅन दिसत होता. प्रियांका आणि निक जोनासने रेड कार्पेटवर कॅमेऱ्यासाठी खास पोझही दिल्या. 

यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात सिनर्स या चित्रपटाला सर्वाधिक म्हणजे तब्बल १६ नामांकने मिळाली आहेत. या सिनेमाने 'ला ला लँड' आणि 'टायटॅनिक' या सिनेमांच्या नामांकनाचा विक्रम मोडला आहे. आता सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Priyanka Chopra stuns at Oscars 2026 with Nick Jonas.

Web Summary : Priyanka Chopra, with Nick Jonas, attended the 98th Academy Awards as a presenter. She wore a white gown, capturing attention on the red carpet. The movie 'Sinners' received 16 nominations.
टॅग्स :ऑस्करप्रियंका चोप्रानिक जोनास