Join us

सेलिब्रिटीजचे अवयवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 14:15 IST

शरीर हे क्षणभंगूर आहे, मृत्यूनंतर सारे नष्ट होते; मात्र अवयवरुपी जिवंत राहायचे असेल, तर अवयवदान करा. मृत्यूपश्चात एक देह ...

शरीर हे क्षणभंगूर आहे, मृत्यूनंतर सारे नष्ट होते; मात्र अवयवरुपी जिवंत राहायचे असेल, तर अवयवदान करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो, तर ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो, हे महत्त्व लक्षात घेऊन अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प केला आहे. आता या सेलिब्रिटीजच्या यादीमध्ये हिरोपंती फेम क्रिती सॅनन या अभिनेत्रीचे नावदेखील जोडले गेले आहे. क्रितीने मृत्यूनंतर नेत्रदान करण्याचा निर्धार केला असून, इतरांनीदेखील अवयवदान करण्याचे ती सध्या आवाहन करीत आहे. तिच्या मते, ‘आपल्या डोळ्यांनी जर कोणी हे सुंदर जग बघत असेल, तर यापेक्षा दुसरा आनंद होऊच शकत नाही.’ या अगोदर बºयाचशा सेलिब्रिटीजनी अवयवदानाचा निर्णय घेतला आहे, त्याचाच घेतलेला हा आढावा...अमिताभ बच्चनबॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनीदेखील विदेशातील एका एनजीओसोबत अवयवदानाबाबत करार केला आहे. मृत्यूनंतर त्यांनी त्यांचे डोळे दान केले आहेत. अमिताभच्या या निर्णयामुळे त्यांचे हॉलिवूडबरोबरच बॉलिवूडमध्येदेखील कौतुक केले गेले. शिवाय, अनेकांनी अमिताभकडून याबाबतची प्रेरणा घेत अवयवदानाचा निर्णय घेतला.आमिर खानसामाजिक कार्यात सदैव आघाडीवर असणाºया मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान यानेदेखील अवयवदान केले आहेत. मृत्यूनंतर आमिरने शरीरातील किडनी, डोळे, हृदय, यकृत आदी अवयव दान केले आहेत. ‘शिप आॅफ थीसियस’ हा चित्रपट बघितल्यानंतर त्याला अवयव दान केल्याची जाणीव झाल्याचे तो म्हणतो. आमिरचा हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. सलमान खाननेहमीच वादात गुरफट असलेल्या सल्लुमियाँचे सामाजिक कार्यदेखील वाखणण्याजोगे आहे. त्यामुळेच त्याला ‘बडे दिलवाला’ असे म्हटले जाते. बीइंग ह्युमन या संस्थेच्या माध्यमातून त्याने अनेकांना मदतीचा हात दिला आहे. त्याचबरोबर त्याने शरीरातील ‘बोन मॅरो’देखील दान केले आहे. बोन मॅरो शरीरातील लाल रक्त कणिका बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. त्याने त्याच्या फॅन्सनादेखील अवयव दान करण्याचे आवाहन केले आहे.प्रियंका चोपडाबॉलिवूडची ‘जंगली बिल्ली’ म्हणून ओळख असलेल्या प्रियंका चोपडा हिला अवयवदानाचे महत्त्व काय असते हे अगदी जवळून अनुभवता आले आहे. कारण, तिच्या वडिलाचा मृत्यू याच कारणाने झाला आहे. त्यामुळे तिने गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या आर्मी फंक्शनमध्ये मृत्यूनंतर अंगदान करण्याची शपथ घेतली होती. तिच्या या निर्णयानंतर सर्व स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.आर. माधवनबॉलिवूडसह साऊथ इंडियन चित्रपटांमध्ये प्रसिद्ध असलेल्या अभिनेता आर. माधवन यानेदेखील शरीरातील महत्त्वपूर्ण अंग दान करण्याचा निर्णय घेतला आहे. डोळे, यकृत, हृदय, लंग्स आदी अवयव दान करणार आहे. चॉकलेट इमेज असलेल्या माधवनचा हा निर्णय अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.राणी मुखर्जीदिग्दर्शक आदित्य चोपडा यांच्याशी विवाहबंधनात अडकलेल्या अभिनेत्री राणी मुखर्जी हिनेदेखील मृत्यूनंतर डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या मते, मृत्यूनंतर माझे डोळे कोणाचे तरी आयुष्य प्रकाशमान करू शकेल. असा मृत्यू माझ्यासाठी आनंददायी असेल. प्रत्येकांनीच अवयवदान करायला हवे. फराह खानफराह खानला बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी आणि पॉवरफुल लेडी म्हणून ओळखले जाते. फराहने हा निर्णय घेतला आहे की, ती डोळे तर दान करणारच शिवाय त्यावेळेस जर कोणाला शरीरातील अन्य अंगाची गरज भासली, तर तो अवयवदेखील ती दान करेल. फराहचा हा निर्णय इतरांसाठी प्रेरणादायी असा ठरत आहे. ऐश्वर्या राय-बच्चनजगातील सुंदर महिलांपैकी एक असलेल्या ऐश्वर्या राय-बच्चन हिने तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. एका आयबँक असोसिएशनसोबत तिने याबाबतचा करार केला आहे. मध्यंतरीच्या काळात ऐश्वर्याने अवयवदान करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सरकारच्या मदतीने मोहीम चालविली होती.