Join us
Daily Top 2Weekly Top 5

इव्हेंटमध्ये वार्डरोब मॉलफंक्शनची शिकार होता होता वाचली प्रियंका चोप्रा, कामी आली ही 5 लाखाची बॅग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 15:01 IST

प्रियंका दिसताच मीडियाचे कॅमेरे तिला कॅप्चर करण्यात बिझी होते. मात्र तिचा ड्रेस ट्रान्सपरंट होता आणि म्हणूनच तिने हातात घेतली बॅगचा आधार घेत बाहेर पडताना दिसतेय.

एखादा इव्हेंट, सोहळ्याला हजेरी लावताना सेलिब्रिटी मंडळी संपूर्ण तयारीत हजेरी लावतात. या प्रसंगी आपण ग्लॅमरस, हँडसम कसे दिसू आणि उपस्थितांच्या नजरांसह कॅमे-याच्या नजरा आपल्याकडे कशा राहतील याची सेलिब्रिटी मंडळी विशेष काळजी घेतात. त्यामुळे महागडे डिझायनर ड्रेसेस किंवा स्टायलिश लूकमध्ये सेलिब्रिटी या कार्यक्रमांना हजेरी लावतात. मात्र कधी कधी याच स्टाईल आणि फॅशनमुळे सेलिब्रिटींवर कधी कधी अवघडल्यासारखी परिस्थिती येते. असंच काहीसं घडलं आहे पिग्गी चॉप्स प्रियंका चोप्राबरोबर.

डिझायनर ड्रेस प्रियंकासाठी मात्र डोकेदुखी ठरला. अनेकदा ट्रायल घेऊनदेखील ड्रेसमध्ये काही कमतरता राहून जातेच असेच काहीसे यावेळीही झाले असावे. प्रियंका दिसताच मीडियाचे कॅमेरे तिला कॅप्चर करण्यात बिझी होते. मात्र तिचा ड्रेस ट्रान्सपरंट होता आणि म्हणूनच तिने हातात घेतली बॅगचा आधार घेत बाहेर पडताना दिसतेय. या ड्रेसमुळे नर्व्हस झाल्याचे पाहायला मिळते. या छोट्याशा बॅगमुळेच  मॉलफंक्शनची शिकार होता होता वाचली प्रियंका. 

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला हॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावली होती. प्रियंका चोप्रा देखील पती निक जोनाससोबत या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होती. या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर असणाऱ्या अँकरनी प्रियंका आणि निकला पाहाताच थांबवले आणि एकमेकांना तुम्ही किस करा असे ते दोन अँकर प्रियंका आणि निकला आग्रह करू लागले. सुरुवातीला प्रियंका या गोष्टीसाठी तयार नव्हती. पण नंतर तिने हळूवार निकच्या ओठावर किस केले. पण किस करताना तिची लिपस्टिक मात्र निकच्या ओठाला लागली. त्यावर तिने लगेचच हाताने ती पुसली. प्रियंका आणि निकचा हा क्यूट व्हिडिओ सध्या त्यांच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास