Oops Moment : डिप नेक गाउनमध्ये अनकम्फर्टेबल दिसली करिना कपूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2017 14:57 IST
आई झाल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत असलेली अभिनेत्री करिना कपूर-खान तिच्या वजनामुळे अन् ड्रेसमुळे चांगलीच चर्चेत असते. नुकतीच ती सोनी बीबीसी अर्थ चॅनलच्या लॉन्चिंग कार्यक्रमात पोहचली होती.
Oops Moment : डिप नेक गाउनमध्ये अनकम्फर्टेबल दिसली करिना कपूर!
आई झाल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावत असलेली अभिनेत्री करिना कपूर-खान तिच्या वजनामुळे अन् ड्रेसमुळे चांगलीच चर्चेत असते. नुकतीच ती सोनी बीबीसी अर्थ चॅनलच्या लॉन्चिंग कार्यक्रमात पोहचली होती. याठिकाणी तिने निखिल थम्पी यांनी डिझाइन केलेला सिल्व्हर रंगाचा डीप नेक गाउन परिधान केला होता. या ड्रेसमध्ये करिनाचे रूप खुलून दिसत होते, परंतु संपूर्ण कार्यक्रमादरम्यान ती या ड्रेसमध्ये अनकम्फर्टेबल असल्याचेही प्रकर्षाने जाणवत होते. ती वारंवार ड्रेस अॅडजेस्ट करताना बघावयास मिळाली. या कार्यक्रमात तिला चॅनलने ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले. खरं तर करिना या गाउनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. सिल्व्हर रंगाचा हा गाउन तिला शोभून दिसत होता. गळ्यात नेकलेस अन् ओठावर डार्क लिपस्टिक तिला खूपच सूट होत होती. वजन वाढलेले असतानाही करिनाचा जलवा बघण्यासारखा होता. जेव्हा तिची इव्हेंटमध्ये एंट्री झाली तेव्हा तिला बघून सगळेच दंग राहिले. मात्र करिना या गाउनमध्ये फारशी अनकम्फर्टेबल दिसली नाही. ती सारखी ड्रेस सावरत असताना दिसत होती. यावेळी करिनाने चॅनल अन् तिच्या पर्सनल लाइफविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या. विशेषत: तैमूरविषयी ती मोकळेपणाने बोलली. यावेळी करिनाने सांगितले की, जेव्हा तिने याच चॅनलच्या प्रोमोसाठी फोटोशूट केले होते तेव्हा ती चार महिन्यांची प्रेग्नेंट होती. मात्र आता माझ्या प्रायॉरिटी बदलल्या असल्याचेही तिने सांगितले. ती म्हणाली की, तैमूरच्या जन्मानंतर तिच्या प्रायॉरिटीज् बदलल्या आहेत. आता मी मल्टी टास्किंग झाली असून, इतर महिलांप्रमाणे लहान मुले आणि त्यांची लाइफ मॅनेज करायला शिकले आहे. खरं तर आई होण्याचा अनुभव माझ्यासाठी एका अॅडव्हेंचरप्रमाणे आहे. त्यामुळेच मी तैमूरचे स्वत: पालनपोषण करण्यास प्राधान्य देते. मला माझ्या बाळाचा सांभाळ करताना व्यक्तिगत अनुभव घ्यायचा आहे. याच कारणाने मी करिष्माकडून कुठल्याच प्रकारच्या टीप्स घेतल्या नसल्याचेही तिने सांगितले. जेव्हा करिनाला रात्रीच्या वेळी तैमूरमुळे तुझी झोप डिस्टर्ब होते का? असे विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, माझी झोपच उडाली आहे. मात्र यामुळे मी खूप आनंदी असल्याचेही तिने सांगितले. तैमूरच्या नावावरून बरीचशी चर्चा रंगली होती. त्यामुळे घरात त्याचे निक नेम ठेवण्यात आले आहे. त्याला सगळेच लिटिल जॉन या नावाने बोलावत असल्याचेही तिने सांगितले.