Join us  

किसिंग सीननंतर इम्रान हाश्मी विद्या बालनला सतत विचारायचा हा एकच प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 7:15 AM

बी-टाऊनमध्ये इम्रान हाश्मी सीरियल किसर म्हणून ओळखला जातो. इम्रान हाश्मीने आतापर्यंतच्या कारकिर्दित अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या मात्र तो ...

बी-टाऊनमध्ये इम्रान हाश्मी सीरियल किसर म्हणून ओळखला जातो. इम्रान हाश्मीने आतापर्यंतच्या कारकिर्दित अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या मात्र तो त्याचा बोल्ज इमेजमधून काही पिछा सोडवू शकला नाही. याच कारणामुळे त्याचे फॅन्स त्याला आजही बोल्ड हिरोच्या नजरेतून बघतात. विशेषत: फिमेल फॅन्स. मात्र खऱ्या आयुष्यात इम्रान असा नाही आहे. याच उदाहरण आहे त्याचा विद्या बालनसोबतचा चित्रपट घनचक्कर. इम्रान विद्या बालनला किस केल्यानंतर एकच प्रश्न विचारायचा. घनचक्कर मध्ये इम्रान हाश्मीची अभिनेत्री होती विद्या बालन. इम्रान विद्याला विचारायचा हा किसिंग सीन बघितल्यानंर सिद्धार्थ मल्होत्रा अर्थात विद्याचा नवरा काय म्हणेल ?तुला वाटते का कि तो माझ्या पेमेंटचा चेक मला देईल ? नुकताच इम्रानने हा खुलासा नेहा धूपियाचा शो 'नो फिल्टर'मध्ये केला. या शो दरम्यान विद्याने सांगितले कि इम्रानला आमच्या किसिंगनंतर फक्त सिद्धार्थची चिंता वाटायची कि सिद्धार्थ काय म्हणले. मी नेहमी विचार करायचे हा मला असा प्रश्न का विचारतो.  ALSO READ :  बहिणीसाठी विद्या बालनने केला प्रेमाचा त्याग! वाचा विद्याच्या पहिल्या प्रेमाची गोष्ट!!2013मध्ये आलेल्या घनचक्कर चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ताने केले होते आणि या चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ राय कपूरने केली होती. विद्याने 14 डिसेंबर 2012 ला सिद्धार्थसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. लवकरच विद्या तुम्हारी सुलू चित्रपट प्रेक्षकांच्ये भेटीला येणार आहे. तुम्हारी सुलू या चित्रपटाची कथा सुलु या स्त्रीच्या अवतीभवती फिरणार आहे. सुलु ही व्यक्तिरेखा विद्या बालन साकारणार असून ती या चित्रपटात आरजेच्या भूमिकेत दिसणार आहे. ही सुलु रात्रीच्या शोंचे सूत्रसंचालन करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. यापूर्वी ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात विद्या आरजेच्या भूमिकेत दिसली होती. आयुष्यात स्वातंत्र्य मिळवू इच्छिणाºया वा स्वतंत्र अस्तित्व असलेल्या महिलेच्या भूमिकेत विद्या यात दिसू शकते.  तुम्हारी सुलु या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेदी करत असून या चित्रपटात नेहा धुपिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.