Join us

सिनेमात दिला फक्त एक किसिंग सीन, रस्त्यावर भीक मागणाऱ्या या मुलीचं एका रात्रीत बदललं नशीब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 14:04 IST

कधीकधी छोट्याशा सीनमध्ये दिसणारे कलाकारही प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात, पण त्यांच्याबद्दल जास्त माहिती समोर येत नाही. अशीच एक अभिनेत्री होती, जी एकेकाळी रस्त्यावर भीक मागायची आणि नंतर चित्रपटांमध्ये छोटे-मोठे सीन्स करताना दिसली.

हिंदी चित्रपटांमधील नायक, नायिका, खलनायक, सह-कलाकार अशा भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना लोक ओळखतात. पण, चित्रपटात दिसणाऱ्या साइड आर्टिस्ट्सवर सहसा कोणी फारसे लक्ष देत नाही, जोपर्यंत त्यांची काहीतरी वेगळी ओळख नसते. उदाहरणार्थ, कोणी खूप जाड किंवा बुटका असेल किंवा त्याची वेगळी ओळख असेल. परंतु, कधीकधी छोट्याशा सीनमध्ये दिसणारे कलाकारही प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात, पण त्यांच्याबद्दल जास्त माहिती समोर येत नाही. अशीच एक अभिनेत्री होती, जी एकेकाळी रस्त्यावर भीक मागायची आणि नंतर चित्रपटांमध्ये छोटे-मोठे सीन्स करताना दिसली. चला जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री.

९०च्या दशकात बॉलिवूड चित्रपटांमधील काही छोट्या-छोट्या सीन्समध्ये दिसलेल्या एका अभिनेत्रीचं नाव होतं मिस मिनी. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, मिस मिनी एकेकाळी रस्त्यावर भीक मागायची. एक दिवस एका दिग्दर्शकाची नजर तिच्यावर पडली आणि तिचं नशीब चमकलं. रस्त्यावर भीक मागणारी ही अभिनेत्री आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांच्या सुपरहिट चित्रपटात दिसली होती.

'दिल' चित्रपटातील तो आयकॉनिक सीन१९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल' चित्रपटात एक सीन होता, जिथे माधुरी दीक्षित, आमिर खानला बॉक्सिंग जिंकण्याचे आव्हान देते आणि म्हणते की जो जिंकेल तो मला किस करेल आणि हरणाऱ्याला (आदि इराणीला) मिस मिनी किस करेल. त्या सीनमुळे तिला तिचे नाव मिळाले, ते नाव होते मिस मिनी. त्या काळात मिस मिनीचे वाढलेले वजन हीच तिची वेगळी ओळख होती. आणि तिच्याबद्दल असेही म्हटले जात होते की, तिची मानसिक स्थिती देखील ठीक नव्हती. पण चित्रपटाचे दिग्दर्शक इंद्र कुमार यांची नजर तिच्यावर पडली आणि त्यांनी तिला त्यांच्या चित्रपटात एक छोटासा रोल दिला. मग काय, रातोरात मिस मिनीचे नशीब बदलले.

'दिल'चा अभिनेता आदि इराणी म्हणाला...एका मुलाखतीत आदि इराणी यांनी मिस मिनीबद्दल सांगितले की, त्यांनी तिला रस्त्यावर भीक मागताना पाहिले होते. त्याच दरम्यान दिग्दर्शक इंदर कुमार अशाच मुलीच्या शोधात होते. त्यांना ही भिकारीण या भूमिकेसाठी परफेक्ट वाटली आणि त्यांनी तिला चित्रपटात एक छोटासा रोल देऊन तिच्याकडून अभिनय करून घेतला.

तोंडातून येत होता विचित्र वासयापुढे आदि इराणीने सांगितले की, 'दिल' मधील तो सीन खूप धोकादायक होता, कारण जेव्हा मिनी त्याचे चुंबन घेण्यासाठी त्यांच्या तोंडाजवळ तोंड नेते, तेव्हा त्यांच्या तोंडून खूप दुर्गंधी येत होती. तिने कित्येक दिवसांपासून आंघोळही केलेली नव्हती. त्याने हे देखील सांगितले की, तिच्या तोंडून येणाऱ्या वासाने त्याची खूप वाईट अवस्था झाली होती. चित्रपटात तिचे जे हावभाव होते, ते अगदी खरे होते.

वर्कफ्रंटमिस मिनीने आमिर खानचा 'दिल', अनिल कपूरचा 'बेटा', आमिर खानचा 'मेला', आणि अजय देवगनचा 'दिलजले' अशा चित्रपटांमध्येही काम केले. 'दिलजले' चित्रपटातील प्रसिद्ध गाणे, 'हो नहीं सकता...' मध्येही मिस मिनीच दिसली होती. मानसिकरीत्या अस्वस्थ असल्यामुळे ती आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नसे आणि त्यामुळेच तिची तब्येत खूप खराब झाली. मिस मिनीने जगाचा निरोप घेतला.

टॅग्स :अजय देवगणआमिर खान