Sushant Singh Rajput Sister Post: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) अकस्मात मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. मुंबईतील वांद्रे येथील परिसरात असलेल्या त्याच्या घरात सुशांतचा मृतदेह आढळला होता. अजूनही सुशांतच्या मृत्यूचं कोडं उलगडलं नाही. अभिनेत्याचा मृत्यू होऊन जवळपास पाच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यात आज रक्षाबंधनाच्या दिवस असल्याने सुशांतची बहिण श्वेता भावुक झाली आहे. सोशल मीडियावर तिने आपल्या भावाच्या आठवणीत मन हेलावून टाकणारी पोस्ट लिहिली आहे.
सुशांत सिंह राजपूची बहीण श्वेताने इन्स्टाग्रामवर रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावुक करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, "आमची दोघांचीही मतं अगदी सारखीच असायची. कारण, आम्ही दोघं कायम सोबतच असायचो. जेवण असो किंवा खेळायचं असेल. आम्ही एकत्रच राहायचो. त्याला आनंदी राहायला आवडायचं. असं म्हणत श्वेता भावुक झाली. याच व्हिडीओला कॅप्शन देत तिने लिहिलंय, "कधी कधी असं वाटतं की दूर नाहीस आमच्या आजुबाजूलाच आहेस. तू इथेच आहेस, लपून सगळं काही पाहतो आहेस. त्यानंतर क्षणार्धात मन गहिवरून येतं. खरंच आता आपण पुन्हा कधीच भेटणार नाही. तुझा आवाज, तुझ्या चेहऱ्यावरचं हसू या केवळ आठवणीच राहतील का?"
त्यानंतर श्वेताने पुढे म्हटलंय, "तुला गमावण्याचं दु: ख इतकं मोठं आहे की माझ्या मनात काय चाललंय हे शब्दातही मांडू शकत नाही. जस जसा दिवस सरतो तशा त्या वेदनाअधिक वाढत चाललं आहे. हे भौतिक जग किती क्षणभंगुर आहे. यासाठी परमेश्वरर हा एकमेव उपाय आहे. मी देवाजवळ अशी प्रार्थना करते की, लवकरच आपली पुन्हा भेट होवो. तोपर्यंत मी तुझ्या हातावर अशीच राखी बांधत राहीन. शिवाय तू जिथे कुठे असशील तिथे आनंही राहा. तुला खूप खूप प्रेम...!" अशी भावुक पोस्ट सुशांतच्या बहिणीने लिहिली आहे.
२०२० साली कोरोना काळात अभिनेता सुशांतसिंह राजपूतने (Sushantsingh Rajput) राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. सुशांतने इतकं टोकाचं पाऊल का उचललं यावरुन बऱ्याच चर्चा झाल्या.