Join us

​OMG!! ही लेखिका म्हणते, रणवीर माझा पती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 16:44 IST

हँडसम अ‍ॅण्ड हॉट रणवीर कपूरवर अनेक मुली मरतात. पण या बातमीने या मुलींनाच नाही तर खुद्द दीपिकाला सुद्धा धक्का ...

हँडसम अ‍ॅण्ड हॉट रणवीर कपूरवर अनेक मुली मरतात. पण या बातमीने या मुलींनाच नाही तर खुद्द दीपिकाला सुद्धा धक्का बसणार. कारण बातमीच तशी आहे. एका मुलीने ती रणवीरची पत्नी असल्याचा दावा केला आहे. होय, ही मुलगी म्हणजे लेखिका निकिता सिंह. निकिता एक नामांकित लेखिका आहे. तिची अनेक पुस्तके गाजलेली आहेत. अलीकडे एका मुलाखतीत निकिताला तिच्या पहिल्या क्रश अर्थात क्रिकेटर हार्दिक पांड्याबाबत विचारण्यात आले. यावर निकिता पुढे जे बोलली ते ऐकून तिची मुलाखत घेणारा पत्रकारही चाट पडला. रणवीर सिंह माझा पती आहे आणि तोच माझे प्रेम आहे, असे निकिता म्हणाली. माझा एक मित्र रणवीरला ओळखतो. त्याने मला सांगितले की, रणवीर दीपिकासोबतच्या रिलेशनमध्ये खूप आनंदी आहे. यावर मी माझ्या मित्राला स्पष्टपणे सांगितले की, रणवीरला  मी माझा पती मानले आहे आणि हा गोडगैरसमज असाच राहावा, असे मला वाटते. यात मी खूप आनंदी आहे. आता निकिताने तर रणवीरला मनातल्या मनात आपला पती मानले आहे.   यावर रणवीर व दीपिका काय म्हणतात, ते बघूयात!