Join us

OMG!! ​वरूणने उघड केले आलियाचे ‘गुपित’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2016 15:18 IST

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लिंकअपबद्दल केवळ चर्चा सुरु आहे. खुद्द आलिया आणि सिद्धार्थ याबद्दल काहीही बोलायला तयार ...

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लिंकअपबद्दल केवळ चर्चा सुरु आहे. खुद्द आलिया आणि सिद्धार्थ याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत. पण शेवटी प्रेम लपल्याने लपणार आहे, थोडेच. अलीकडे आलिया व सिद्धार्थ यांच्या ब्रेकअपच्या वावड्याही उठल्या. आता या दोघांमध्ये काय सुरू आहे, हे ठाऊक नाही़ मात्र आलियाचा खास मित्र वरूण धवन याने मात्र आलियाचे एक ‘गुपित’ उघड केलेय़ होय, आलिया सिद्धार्थआधी आणखी एका व्यक्तिला डेट करून चुकलीय़ ही व्यक्ति म्हणजे दुबईत राहणारा अली(दंडारकर). वरूणच्या मते, आलिया अलीला डेट करून चुकलीयं. होय ‘कॉफी विद करण’ या लोकप्रीय शोमध्ये वरूणने आलियाच्या या ‘राज’ वरून पडदा उठवलाय़ आलिया अलीकडे दुबईत राहणाºया अलीला डेट करीत होती़ अर्थात आलियाने कधीच तिचा कुणी बॉयफ्रेन्ड आहे, हे मान्य केले नाही़ मात्र वरूणने केलेल्या खुलाशानुसार, अली आलियावर प्रचंड प्रेम करतो़ करणच्या या शोवर वरूण आणि अर्जून दोघेही आले होते़ तुम्ही दोघांनी कधी आलियाला डेट केले आहे का? असा प्रश्न या दोघांना विचारण्यात आला़ यावर दोघांनीही नकारार्थी उत्तर दिले़ आमच्या कामामुळे आम्हा दोघांनाही आलियासोबत डेट करण्यास वेळ नव्हताच़ यामुळे आमच्यात केवळ मैत्री होऊ शकली, बाकी काहीही नाही़ वरूणच्या मते, त्याने आलियासोबत अनेक चित्रपटांत काम केलेय़ त्यामुळे त्याचे नाव आलियासोबत जोडले गेले़ तो आणि आलिया केवळ एकमेकांचे चांगले मित्र आहेत़ आलिया तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत राहते़ तिच्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात झाली़ अगदी तेव्हापासून तिच्या अफेअरच्या बातम्याही यायला लागल्या़ पण आलियाने कायम या बातम्यांचा इन्कार केला़ माझे सर्वांसोबत केवळ आणि केवळ मैत्रीचे नाते आहे, असेच ती सांगत आलीय़