Join us

OMG..! Sunny Deolचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'गदर २'ची स्टोरी झाली लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 21:02 IST

सनी देओल(Sunny Deol)चा आगामी चित्रपट 'गदर २' (Gadar 2)ची कथा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाभोवती फिरताना दिसणार आहे. ज्यामध्ये तारा सिंग आपल्या मुलासाठी पाकिस्तानची सीमा ओलांडणार आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्यांच्या आगामी 'गदर २' (Gadar 2) या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे, ज्यात सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल (Amisha Patel) सारखे स्टार्स दिसणार आहेत. गदर (Gadar)मध्ये दिसलेला उत्कर्ष शर्माही सनी देओलसोबत गदर २ या चित्रपटात दिसणार आहे. गदर चित्रपटात सनी देओल पत्नीसाठी पाकिस्तानात गेला होता आणि गदर २ चित्रपटातही सनी देओल पुन्हा पाकिस्तानात जाणार आहे, पण यावेळी तो आणखी एका कारणामुळे सीमा ओलांडणार आहे.

पिंकविलाच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार, गदर २ चित्रपटाची कथा १९७० मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धाभोवती फिरताना दिसणार आहे. उत्कर्ष शर्मा या चित्रपटात एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याच्या आयुष्यासाठी सनी देओल पाकिस्तानात प्रवेश करणार आहे. या चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने पोर्टलला माहिती दिली की, 'गदरची तारा आणि सकीना यांची प्रेमकथा प्रेक्षकांना दाखवण्यात आली. भारत-पाकिस्तानच्या फाळणीभोवती फिरणाऱ्या या चित्रपटात सुंदर प्रेमकथा अनिल शर्मा यांनी रेखाटली होती, ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

गदर २ मध्ये अनिल शर्मा १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध सादर करणार आहेत. यामध्ये उत्कर्ष शर्मा एका भारतीय सैनिकाची भूमिका साकारणार आहे. या लढ्यादरम्यान, तारा सिंगच्या मुलाचा जीव धोक्यात येईल, त्यानंतर तो त्याला वाचवण्यासाठी पाकिस्तानला जाईल.

टॅग्स :सनी देओलअमिषा पटेल