Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG....! सारा अली खानने महागड्या कारऐवजी चक्क रिक्षातून केला प्रवास, पहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 20:00 IST

अभिनेत्री सारा अली खानने 'केदारनाथ' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर ती 'सिम्बा'मध्ये झळकली. या दोन्ही सिनेमातील तिच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले.

अभिनेत्री सारा अली खानने बॉलिवूडमध्ये 'केदारनाथ' चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे सर्वत्र खूप कौतूक झाले. त्यानंतर ती रणवीर सिंगसोबत 'सिम्बा' चित्रपटात झळकली. या चित्रपटातील तिची भूमिका रसिकांना खूपच भावली. सारा मागील काही दिवसांपूर्वीच सुट्टी एन्जॉय करण्यासाठी परदेशात गेली होती. त्यानंतर आता ती परत भारतात परतली असून तिने कामालाही सुरूवात केली आहे. साराचा एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री सारा फोर व्हिलरमध्ये नाही तर चक्क रिक्षातून प्रवास करताना दिसते आहे. खरे तर तिला जिममध्ये जायचे होते. यासाठी तिने कार नाही तर रिक्षातून जाणे पसंत केले. यावेळी सारासोबत तिची मैत्रिणही होती. 

यावेळी सारा खानने शॉर्ट्स आणि टी-शर्ट घातला होता. या सिम्पल लूकमध्ये सारा खूपच सुंदर दिसत होती. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिचे खूपच कौतुक केले. 

 सारा अली खानने पहिल्यांदाच रिक्षातून प्रवास केलेला नाही. यापूर्वी देखील ती अनन्या पांडेसोबत रिक्षातून जाताना दिसली होती. त्यावेळी देखील या दोघींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता.

सारा ही मागील काही दिवसांपूर्वीच आपली सुट्टी एन्जॉय करण्यासाठी न्यूयॉर्कला गेली होती. त्यानंतर काही दिवसांनी ती भारतात परतली. सारा आपली सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आपल्या गर्ल गँगसोबत गेली होती. 

साराच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सांगायचे तर ती लव आज कलच्या सीक्वलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला देखील तिने सुरूवात केली आहे.

यात तिच्यासोबत बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन दिसणार आहे.

टॅग्स :सारा अली खानकार्तिक आर्यन