Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG..! मलायका अरोरा तब्बल १९ वर्षानंतर बनणार आई?, वयाच्या ४७व्या वर्षात केला हा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 18:04 IST

मलायका अरोराने नुकतेच सुपर डान्सर ४ शोमध्ये केलेला खुलासा ऐकून सर्वजण हैराण झाले आहेत.

छैंया छैंया आणि मुन्नी बदनाम हुई या गाण्यावर थिरकत आपल्या तालांवर सर्वांना ठुमके लगावायला भाग पाडणारी अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येते. मग कधी ग्लॅमरस फोटोमुळे तर कधी अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत येत असते. सध्या मलायका अरोरा डान्स रिएलिटी शो सुपर डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळते आहे. याच शोमध्ये मलायकाने केलेला खुलासा ऐकून सर्व लोक हैराण झाले आहेत. 

मलायकाचे आताचे वय ४७ वर्षे आहे आणि तिला १९ वर्षांचा एक मुलगा आहे, ज्याचे नाव आहे अरहान खान. आता तब्बल १९ वर्षानंतर पुन्हा एकदा मलायका पुन्हा एकदा आई बनण्याचे प्लानिंग करते आहे.

खरेतर तिला एक मुलगी हवी होती. याचा खुलासा तिने सुपर डान्सर ४ शोमध्ये केला होता. या शोमधील अंशिका राजपूतचा डान्स पाहून मलायकाने खुलासा केला होता.

त्यावेळी ती म्हणाली होती की, तिला एक मुलगी हवी होती. बोलता बोलता ती म्हणाली की, तिला एक मुलगी पाहिजे. तिच्या आजूबाजूला सगळे मुलगेच आहेत. तीदेखील एका मुलाची आई आहे. तिला एक मुलगी हवी आहे जिच्यासोबत ती तिचा मेकअप, शूज आणि कपडे शेअर करू शकेल.

मलायका पुढे म्हणाली की, माझी इच्छा आहे मला मुलगी असावी किंवा मी एक मुलगी दत्तक घेईन. माझी ही मनापासूनची इच्छा आहे. मलायका अरोरा भविष्यात यासाठी काय पाऊल उचलते हे पाहणे कमालीचे ठरेल.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर