Join us
Daily Top 2Weekly Top 5

​OMG!! कुणासोबत दिसली जान्हवी कपूर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 14:02 IST

फायनली, जान्हवी कपूर मेक्स हर फर्स्ट आॅफिशिअल अपिअन्स... होय, श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूर हिचा ...

फायनली, जान्हवी कपूर मेक्स हर फर्स्ट आॅफिशिअल अपिअन्स... होय, श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूर हिचा ‘आॅफिशिअल अपिअरन्स’ काल रात्री चर्चेचा विषय ठरला. जान्हवी कपूर काल आॅफिशिअली दिसली तेही तिचा कथित बॉयफ्रेन्ड शिखर पहारिया याच्यासोबत. ‘डिअर जिंदगी’च्या स्पेशल स्क्रीनिंगला जान्हवी, शिखर आणि सोबत श्रीदेवी आणि बोनी असे सगळेजण एकत्र दिसले. शिखरचे जान्हवी खरोखरीच काय नाते आहे, हे अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नाही. अलीकडे दोघेही एकमेकांना किस करत असतानाचे फोटो व्हायरल झाले होते. ते बघता  सध्या तरी जान्हवीचा बॉयफ्रेन्ड अशीच  शिखरची ओळख आहे. श्रीदेवी, बोनी, जान्हवी आणि शिखर एका कारमधून ‘डिअर जिंदगी’च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचले. यावेळी शिखर हा जान्हवीच्या अगदी बाजूला बसलेला दिसला. काही दिवसांपूर्वीच श्रीदेवीने जान्हवीला शिखरला भेटायला बंदी केल्याची खबर मीडियात आली होती. बॉलिवूडमध्ये एका विशिष्ट उंचीवर स्वत:ला बघायचे तर ‘नो बॉयफे्रन्ड’ हे तत्त्व सतत स्मरणात ठेव, असे तिने जान्हवीला बजावल्याचे कळले होते. केवळ शिखरच नाही तर मित्रांसोबत बाहेर फिरण्यासही श्रीदेवीने जान्हवीला बंदी घातल्याचे ऐकवात आले होते. पण काल शिखर व जान्हवीच्या ‘आॅफिशिअन अपिअरन्स’वरून तरी ‘नो बॉयफे्रन्ड’च्या बातमीत आम्हाला तरी काही तथ्य असेल, असे वाटत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून जान्हवी बॉलिवूड डेब्यू करणार, अशी चर्चा आहे. त्यामुळेच बॉलिवूडप्रेमी जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूकडे नजरा लावून बसलेतं. ही प्रतीक्षा केव्हा संपते ते बघूयात!शिखर व जान्हवीचे काही फोटो अलीकडे व्हायरल झरले होते.शिखरच्या प्रेमात ‘वेडी’ झालेली जान्हवी कपूर हिच तर नाही ना?