OMG !! दीपिकाने सोनम कपूरला असे केले ऐनवेळी ‘OUT’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 14:46 IST
दीपिका पादुकोण आणि सोनम कपूर या दोन अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये एकाचवेळी पदार्पण केले होते. पण आज दीपिका व सोनमच्या स्टेटसमध्ये ...
OMG !! दीपिकाने सोनम कपूरला असे केले ऐनवेळी ‘OUT’?
दीपिका पादुकोण आणि सोनम कपूर या दोन अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये एकाचवेळी पदार्पण केले होते. पण आज दीपिका व सोनमच्या स्टेटसमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. कदाचित याचमुळे एका अवार्ड शोमध्ये ऐनवेळी सोनमच्या जागी दीपिकाची वर्णी लागली.नुकताच हा अवार्ड शो झाला. खरे तर, या अवार्डमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना सोनम कपूरच्या हस्ते लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड देऊन गौरविण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी अशी काही सूत्रे हलली की, आयोजकांनी सोनमचे नाव कापून दीपिकाला एन्ट्री दिली. मग काय, दीपिकाच्या हस्ते रेखा यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवार्ड प्रदान करण्यात आला. दीपिकासाठी हा खूप मोठा गौरव होता. सोनम कपूरला डावलून तिने हा गौरव मिळवला. मग काय? माध्यमांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला नसेल तर नवल.सोनम व दीपिका यांनी सन २००७ मध्ये एकाचवेळी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. सोनम संजय लीला भन्साळींच्या ‘सांवरिया’मध्ये लीड रोलमध्ये होती तर दीपिकाने ‘ओम शांती ओम’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. पण ‘सांवरिया’ बॉक्सआॅफिसवर फारसा प्रभाव दाखवू शकला नव्हता. याऊलट दीपिकाचा ‘ओम शांती ओम’ चांगलाच हिट झाला होता. तेव्हापासून सोनम दीपिकापासून पिछाडली. इतकी की, आत्तापर्यंत तिला दीपिकाला गाठला आलेले नाही. आता तर दीपिका फार पुढे निघून गेलीय. अवार्ड शोमध्ये ऐनवेळी तिची लागलेली वर्णी हा त्याचाच परिणाम आहे.सध्या दीपिका ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. लवकरच तिचा हॉलिवूडपट प्रदर्शित होतो आहे.