‘ओके जानू’चे टायटल साँग रिलीज ; श्रद्धा कपूर-आदित्य रॉय कपूरची लाजबाव केमिस्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:45 IST
Title song of Shraddha, Aditya's 'OK Jaanu' released ; ‘आके जानू’ या चित्रपटाचे टायटल साँग ‘जानू... चल ना कुछ करते है’ रिलीज करण्यात आले आहे. ए.आर. रहमान यांनी गायलेल्या या ‘आके जानू’च्या टायटल साँगमध्ये आदित्य व श्रद्धा मस्ती करताना दिसत आहे.
‘ओके जानू’चे टायटल साँग रिलीज ; श्रद्धा कपूर-आदित्य रॉय कपूरची लाजबाव केमिस्ट्री!
आदित्य रॉय कपूर व श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आगामी ‘आके जानू’ या चित्रपटाचे टायटल साँग ‘जानू... चल ना कुछ करते है’ रिलीज करण्यात आले आहे. ‘आके जानू’चे हम्मा हम्मा हे गाणे सध्या चांगलेच ट्रेन्ड करीत असून याचा मेकिंग व्हिडीओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. ए.आर. रहमान यांनी गायलेल्या या ‘आके जानू’च्या टायटल साँगमध्ये आदित्य व श्रद्धा मस्ती करताना दिसत आहे. दिग्दर्शक शाद अली यांचा ‘आके जानू’हा चित्रपटाने फारच कमी वेळात चर्चेत स्थान मिळविले आहे. ‘आशिकी २’ या चित्रपटातील रोमाँटिक जोडी आदित्य रॉय कपूर व श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून दोघेही बिनधास्त असल्याचे दिसते. ओके जानूचे टायटल साँग पाहून याचा अंदाज लावता येतो. गुलजार यांनी लिहिलेल्या व ए.आर. रहमान यांनी गायललेल्या या गाण्याच्या ओळी ‘जानू... चल ना कुछ करते है’ अशा आहेत. दोघेही मोटार सायकलवरून मुंबईची सैर करताना दिसत आहेत. दोघांची केमेस्ट्री चांगलीच जुळून आली आहे. ए.आर. रहमानसोबतच श्रीनिधी व्यंकटेश हिने यांनी हे गाणे गायले आहे. गाण्याचे बोल व संगीत लक्षवेधक व कर्णप्रिय आहेत. हे गाणे पाहताना एक वेगळीच मजा येते.‘ओके कन्मनी’ या तमिळ चित्रपटाचा ‘ओके जानू’ हा रिमेक असल्याने प्रेक्षकांच्या चित्रपटाकडून असलेल्या अपेक्षा वाढल्या आहेत. करण जोहर आणि मनी रत्मन यांनी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १३ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाची गाणी व पोस्टरपाहून नव्या वर्षांत प्रेक्षकांना रोमाँटिक ट्रिट मिळणार असे म्हणायला हरकत नाही. ">http://