Join us
Daily Top 2Weekly Top 5

O Romeo Box Office : 'धुरंधर'च्या वाटेवर शाहिद कपूरचा 'ओ रोमिओ', दोन दिवसांतच कमावले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 09:42 IST

गँगस्टर ड्रामा आणि रोमान्सचे मिश्रण असलेला हा सिनेमा 'बॉर्डर २'ला चांगलीच टक्कर देत असून 'धुरंधर'च्या वाटेवर आहे. 'ओ रोमिओ'चं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

व्हॅलेंटाइन डेच्या मुहुर्तावर शाहिद कपूरचा 'ओ रोमिओ' सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. १३ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला चाहत्यांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. शाहिदचा खुंखार लूक पाहून या सिनेमाबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. गँगस्टर ड्रामा आणि रोमान्सचे मिश्रण असलेला हा सिनेमा 'बॉर्डर २'ला चांगलीच टक्कर देत असून 'धुरंधर'च्या वाटेवर आहे. 'ओ रोमिओ'चं दोन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

'ओ रोमिओ'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. या सिनेमाने अंदाजे ८.५ कोटींचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत वाढ झाल्याचं दिसत आहे. पहिल्या शनिवारी या सिनेमाने अंदाजे १२.२५ कोटींचा बिजनेस केला आहे. दोन दिवसांत 'ओ रोमिओ'ने जवळपास २० कोटींचा गल्ला जमवला आहे. वीकेंडला हा सिनेमा चांगली कमाई करेल अशी अपेक्षा होती. मात्र भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यामुळे 'ओ रोमिओ'च्या बॉक्स ऑफिस कमाईला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. 

'ओ रोमिओ'चं दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केलं आहे. या सिनेमात शाहिद कपूर, तृप्ती डिमरी, नाना पाटेकर, दिशा पटानी, अविनाश तिवारी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'ओ रोमियो' हा चित्रपट १९९५ च्या काळातील मुंबईतील गँगस्टर संस्कृतीवर आधारित असून त्यात भरपूर ॲक्शन बघायला मिळणार आहे. या सिनेमाचं १५० कोटींचं बजेट असल्याची चर्चा आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : O Romeo: Shahid Kapoor's film earns ₹20 crore in two days

Web Summary : Shahid Kapoor's 'O Romeo,' released on Valentine's Day, is drawing a good response. The film earned ₹8.5 crore on its first day and ₹12.25 crore on the second. The film has earned approximately ₹20 crore in two days. It may face a slowdown due to the cricket match.
टॅग्स :शाहिद कपूरतृप्ती डिमरी