Join us

​आता ‘किसींग गर्ल’ वाणीची एकच इच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 14:30 IST

अभिनेत्री वाणी कपूर सध्या जोरात आहे. मोठ्या पडद्यावरच्या डझनावर चुंबनामुळे वाणी सध्या ‘किसींग गर्ल’ म्हणून ओळखली जातेय. याच ‘किसींग ...

अभिनेत्री वाणी कपूर सध्या जोरात आहे. मोठ्या पडद्यावरच्या डझनावर चुंबनामुळे वाणी सध्या ‘किसींग गर्ल’ म्हणून ओळखली जातेय. याच ‘किसींग गर्ल’ला आता प्रेम करायचेयं. तेही ‘वीर-जारा’ आणि ‘लम्हे’सारखे.  ‘शुद्ध देसी रोमान्स’नंतर तब्बल तीन वर्षांनी वाणी ‘ बेफिक्रे’त दिसणार आहे. आदित्य चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात वाणी रणवीर सिंहसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. रणवीरसोबत काम करण्याची वाणीची एक इच्छा ‘ बेफिक्रे’द्वारे पूर्ण झालीय. आता मात्र वाणीला ‘वीर-जारा’ आणि ‘लम्हे’सारखे प्रेम करायचेय. होय, खुद्द वाणीनेच ही माहिती दिली. यश चोपडा यांच्या ‘वीर-जारा’ आणि ‘लम्हे’ या चित्रपटांचा रिमेक आला तर आपण या चित्रपटात असावे, अशी वाणीची इच्छा आहे. एका मुलाखतीत खुद्द वाणीनेच ही माहिती दिली. खरे ती मी हॉलिवूडच्या प्रेमात आहे. पण यश चोप्रा यांचे ‘लम्हे’,‘वीर-जारा’ हे माझे आवडते चित्रपट. शाहरूख खानचा ‘दिल से’, ‘चक दे इंडिया’ आणि ‘स्वदेश’ हेही माझ्या आवडीचे सिनमे. प्रियांका चोप्राचा ‘बर्फी’सुद्धा मला प्रचंड आवडतो. पण यापैकी कुठल्या चित्रपटाचा रिमेक झाला तर तो ‘वीर-जारा’ आणि ‘लम्हे’चा व्हावा, असे मला वाटते. या चित्रपटाच्या रिमेकमध्ये मला कुठलीही भूमिका मिळो, मी ती न कुरबूर करता अगदी एका पायावर करेल. आणखीही काही चित्रपट आहेत. ज्याच्या रिमेकमध्ये काम करणे मला आवडेल.  ‘दिल से’मधील मनीषा कोईराने साकारलेली भूमिकाही मला करायला आवडेल. प्रियंकाने साकारलेली ‘झिलमिल’ही मला पडद्यावर जिवंत करायला आवडेल.एकंदर काय, तर वाणीला आता ड्रिम रोलचे वेध लागले आहेत. आता तिचे हे  ड्रीम रोल कधी रिअल होतात, ते बघूच!