Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गंगूबाई काठियावाडी' नाही तर या सिनेमात आलिया भटसोबत रोमान्स करणार पार्थ समनाथ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 18:30 IST

पार्थ आलियासोबत 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये रोमान्स करणार अशा बातम्या येत होत्या.

संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित गंगूबाई काठियावाडी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आलिया भटसोबत या सिनेमातून  टीव्ही अभिनेता शांतनु माहेश्वरी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. आणखी एक टीव्ही स्टार आलिया भट स्टारर सिनेमातून बॉालिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. त्याचे नाव आहे पार्थ समथान. पार्थ आलियासोबत 'गंगूबाई काठियावाडी'मध्ये रोमान्स करणार अशा बातम्या येत होत्या.  

आलियासोबत रोमान्स करणार पार्थ लोकप्रिय टेलीव्हिजन मालिका 'कसौटी जिंदगी की' स्टार पार्थ समथन एका मुलाखतीत म्हणाला होता की, लवकरच तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, तेव्हापासून बातमी येऊ लागली आहे की, तो आलियाच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटातून पदार्पण करणार आहे. यात कितीपत सत्य आहे हे पार्थच सांगू शकले. 

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, “पार्थ नक्कीच आलियासोबत हिंदी चित्रपट साईन केला आहे पण तो 'गंगूबाई काठियावाडी'  नाही. 'गंगूबाई'मध्ये शांतनु माहेश्वरी आहे. पार्थने रेसुल पकुट्टीचा पिहरवा साईन केला आहे आणि आलियादेखील या सिनेमात झळकणार आहे. भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहीद हरभजन सिंग यांच्या खऱ्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे. 

पुढच्या वर्षी सुरु होणार पिहरावाचं शूटिंग आलियाच्या सिनेमाचे शूटिंग या डिसेंबरमध्ये सुरू होणार होती पण कोविड-19 आणि च्या नव्या स्ट्रेनमुळे शूटिंग पुढे ढकलण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, “आलिया आधी भन्साळींच्या गंगूबाई काठियावाडी, नंतर ब्रह्मास्त्र आणि आरआरआर यांचे शूटिंग पूर्ण करेल. आलिया पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला रणवीर सिंगसोबत सिनेमाच्या शुटिंगलाही सुरुवात करणार आहे.  रसूल पुकट्टीचा पिहरावा हा एक वॉर ड्रामा सिनेमा असल्यामुळे यासाठी एका मोठ्या क्रूची आवश्यकता असेल. सध्या रेसुल पुकट्टी आलिया आणि तिच्या टीमशी तारखांविषयी चर्चा करीत आहे. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षापासूनच सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.  

टॅग्स :आलिया भटकसौटी जिंदगी की 2