Join us

NOT ALL IS WELL? ​सलमान खान व यूलिया वंतूर का दिसताहेत इतके रागात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 13:57 IST

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान आणि रोमानियन ब्युटी यूलिया वेंटर या दोघांनी अद्याप आपले रिलेशनशिप मान्य केलेले नाही. पण ...

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान आणि रोमानियन ब्युटी यूलिया वेंटर या दोघांनी अद्याप आपले रिलेशनशिप मान्य केलेले नाही. पण आमचे मानाल तर सध्या सलमान व यूलिया या दोघांमध्ये कसले तरी टेन्शन नक्की आहे. आमच्या म्हणण्यावर तुम्ही सहजी विश्वास ठेवणार नाहीत, हे आम्हाला ठाऊक आहे. पण आम्ही याचा पुरावा देऊ शकतो. सलमान व यूलियाचे कालच्या पार्टीतील काही फोटो सध्या व्हायरल झालेत. ते पाहून तुम्हाला दोघांमध्ये आॅल इज वेल नाही, हे पटल्याशिवाय राहणार नाही. काल रात्री ‘ट्युबलाईट’ची रॅपअप पार्टी रंगली. दिग्दर्शक कबीर खान याने ही पार्टी अरेंज केली होती. या पार्टीत सलमान होता. शिवाय यूलियाही होती. याशिवाय ‘ट्युबलाईट’ची संपूर्ण स्टार कास्ट आणि काही जवळचे मित्रमंडळीही आले होते. खरे तर सलमान आणि यूलिया या दोघांनी या पार्टीला एकत्र येणे अपेक्षित होते, पण झाले भलतेच. यूलिया व सलमान दोघेही या पार्टीला वेगवेगळ्या कारमधून आले.आता तुम्ही म्हणाल यात काय नवल? पण पुढे ऐका.  हे दोघे पार्टीतून बाहेर पडले, त्यावेळी दोघेही जाम रागात दिसले. सर्वात आधी सलमान पार्टीतून निघाला. तो जाम संतापलेला आहे, हे त्याच्या चेहºयावरून स्पष्टपणे जाणवत होते.सलमान बाहेर पडताच त्याच्या मागोमाग यूलियाही पार्टीतून निघाली. तीही जरा रागातच. फोटोग्राफर्सला पोझ देण्याच्या भानगडीत न पडता ती चालती झाली. आता यूलिया व सलमानमध्ये पार्टीत काही वाद झाला की आणखी काही, हे अद्याप कळले नाही. पण काहीतरी नक्की झाले, हे मात्र तितकेच नक्की.ALSO READ : सल्लूमियाँ झाला चित्रकार; रेखाटले युलियाचे चित्र!‘भाई’च्या आयुष्यातील ‘स्पेशल ती’ कोण ?या पार्टीतून सलमान व यूलिया दोघेही फोटोग्राफर्सला पोझ न देता तडकाफडकी निघून गेलेत. केवळ कबीर आणि त्याची ब्युटिफुल वाईफ मिनी माथूर हे दोघे तेवढेच फोटोग्राफर्सला पोझ देण्यात उत्सूक दिसले.