Join us

"इंडस्ट्रीत माझ्यासोबत गैरवर्तन करण्याची कोणाची हिंमत नाही...", एली अवरामने सलमानला म्हटलं 'देवदूत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 16:59 IST

Elli Avram : बॉलिवूड अभिनेत्री आणि 'बिग बॉस ७' मध्ये दिसलेली एली अवरामने अभिनेता सलमान खानला आपल्यासाठी देवदूत असल्याचे म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि 'बिग बॉस ७' मध्ये दिसलेली एली अवरामने अभिनेता सलमान खानला आपल्यासाठी देवदूत असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर, स्वीडनमध्ये जन्मलेल्या या अभिनेत्रीने सांगितले की, सलमानमुळे इंडस्ट्रीत तिच्यासोबत गैरवर्तन करण्याची हिंमत कोणी करत नाही.

स्वीडनमध्ये जन्मलेल्या बॉलिवूड अभिनेत्री एली अवरामने २०१३ मध्ये मनीष पॉलसोबत 'मिकी व्हायरस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या कामावर प्रेक्षक फिदा झाले. त्याच वर्षी ती सलमान खानच्या 'बिग बॉस ७' या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाली. त्यानंतर २०१५ मध्ये कपिल शर्मासोबतच्या 'किस किस को प्यार करूं' या चित्रपटाने तिची लोकप्रियता वाढवली. हिंदीसोबतच तमिळ, कन्नड आणि मराठी चित्रपटांमध्येही दिसलेल्या या सुंदर अभिनेत्रीने आता सलमान खानसोबतच्या नात्यावर  भाष्य केले आहे. एलीने भाईजानला 'देवदूत' म्हटले आहे. ती म्हणते की, सलमान खानमुळे इंडस्ट्रीत तिच्यासोबत गैरवर्तन करण्याची हिंमत कोणी करत नाही. इतकेच नव्हे तर तिने हेही सांगितले की, लोक 'दबंग खान'ला घाबरतात.

एली अवराम करियर घडवण्यासाठी स्वीडनमधून मुंबईत आली आणि आता ती मुंबईचीच होऊन राहिली आहे. भारतात डझनहून अधिक चित्रपट केलेल्या एलीने 'स्क्रीन'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, सलमान खान तिच्यासाठी खूप प्रोटेक्टिव्ह राहिला आहे. याबाबतीत ती स्वतःला भाग्यवान मानते. एली अवराम म्हणते, "मी सलमान खानच्या संपर्कात आहे. खरे तर, मी त्याला अनेक वर्षांनंतर नुकतेच गणपती पूजेत भेटले होते. मी खरंच कोणासोबतही संपर्क कायम ठेवण्यात खूप वाईट आहे. मी माझ्याच जगात राहते. दुसऱ्या देशात एकटी राहत असताना तुम्हाला अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याची आणि लक्ष देण्याची गरज असते. विशेषतः ज्या देशात तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत जन्मलात आणि वाढलात, त्या देशापेक्षा हा देश खूप वेगळा असताना तर अधिक काळजी घ्यावी लागते."

English
हिंदी सारांश
Web Title : Salman Khan is my guardian angel: Elli AvrRam reveals

Web Summary : Elli AvrRam credits Salman Khan for shielding her in Bollywood. She considers him a guardian angel, stating his influence prevents mistreatment. AvrRam, who debuted in 'Mickey Virus,' feels fortunate for his protective presence and support.
टॅग्स :एली अवरामसलमान खान