'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.नाटक, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात प्रिया बापटने वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. याशिवाय नेहमी ती सोशल मीडियावर फोटोजही शेअर करत असते आणि या फोटोंतून ती प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडताना पहायला मिळते.
लॉकडाऊन दरम्यान शेअर केला प्रिया बापटने नो- मेकअप लूक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 16:53 IST