Join us
Daily Top 2Weekly Top 5

ना महागडे सोफे, ना सजावट; सी-फेसिंग फ्लॅटमध्ये राहूनही अभिनेत्री जमिनीवर बसून जेवते! फराह खानही झाली अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:08 IST

३०० कोटींचा हिट चित्रपट देणारी अभिनेत्री! जगतेय अत्यंत साधं जीवन, घर  पाहून फराह खान झाली हैराण 

Adah Sharma: 'द केरला स्टोरी गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अदा शर्मा इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.तब्बल १५ वर्षांच्या संघर्षानंतर सुदिप्तो सेन दिग्दर्शित द केरळ स्टोरी या या चित्रपटाने अदा शर्माला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी कमाई केली होती.काही महिन्यांपूर्वीच अदा शर्मा तिचं घरं सोडून वांद्रे येथील भव्य फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली. आता या घराची झलक समोर आली आहे.

अभिनेत्री अदा शर्मा मुंबईतील वांद्रे येथील सी-फेसिंग डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहते.एकेकाळी हे घर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मालकीचे होते.अलिकडेच, चित्रपट निर्माती आणि नृत्यदिग्दर्शिका फराह खानने या घराला भेट दिली आणि तिच्या यूट्यूब चॅनलवर त्याचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याचं कारण म्हणजे अदा शर्माचं घर आहे. खुद्द फराह खान अभिनेत्रीचं घर पाहून हैराण झाली. खरंतर सेलिब्रिटीचं घर म्हटलं तर त्यांच्या घरात महागडे सोफे आणि महागडी सजावट असं साधारण चित्र प्रत्येकाच्या डोक्यात स्पष्ट असतं. मात्र, अदा शर्माचं घर याला अपवाद ठरलं आहे. फराहने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की, त्या घरात एकही खुर्ची किंवा फर्निचरचा नव्हता, कपाटे नव्हती, खुर्च्या नव्हत्या, आणि टेबलही नाही.संपूर्ण घर तिने मोकळं ठेवलं आहे.  इतकंच नाही, तर एडाचं स्वयंपाकघर अत्याधुनिक नसून अगदी साधं होतं. एडाच्या स्वयंपाकघरात कोणतीही आधुनिक उपकरणे नाहीत. तिच्या स्वयंपाक घरात पारंपरिक भांडी आहेत.

अभिनेत्रीच्या घराची होतेय चर्चा...

प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही अदा अत्यंत साधं आयुष्य जगते. तिचा हा साधेपणा पाहून फराह खानने गंमतीने विचारलं, "घरी चोरी झालीये का?" तिची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाली. दरम्यान, हा अदाचास्वत:चा निर्णय आहे. अदा म्हणते, कमी फर्निचर असलेल्या घरात तिला मोकळेपणाने वावरता येतं.ती घरात सहजपणे फिरू शकते, नाचू शकते, सराव करू शकते. त्यामुळे तिने हा निर्णय घेतला. ती या घरात तिच्या आई आणि आजीसोबत राहते.

इतकंच नाहीतर सोफ्यावर किंवा खुर्च्यांवर बसण्याऐवजी तिला जमिनीवर बसायला आवडते. पाहुणे आल्यावर, ती त्यांच्यासाठी बसायला चटया अंथरते. अदाच्या या साध्या जीवनशैलीचं चाहते कौतुक करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Adah Sharma's simple lifestyle in sea-facing flat surprises Farah Khan.

Web Summary : Adah Sharma, known for 'The Kerala Story,' lives simply in her sea-facing Mumbai flat. Farah Khan was surprised by the lack of furniture and modern amenities. Adah prefers floor seating and a minimalist lifestyle for freedom of movement.
टॅग्स :अदा शर्माफराह खानबॉलिवूडसेलिब्रिटी