Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता येणार मजा! 'नो एन्ट्री २'मध्ये वरुण धवन-अर्जुन कपूरला मिळणार 'या' अभिनेत्याची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 13:41 IST

वरुण धवन आणि अर्जुन कपूरच्या नावावर आधीच शिक्कामोर्तब झालं होतं. आता कोणाची झाली एन्ट्री?

सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान या तिकडीचा २००५ साली आलेला 'नो एन्ट्री' सिनेमा खूप गाजला होता. लग्न, विवाहबाह्य संबंध या विषयावर हा कॉमेडी सिनेमा होता. गेल्या काही वर्षांपासून याच्या दुसऱ्या पार्टची चर्चा आहे. 'नो एन्ट्री २' मध्ये आता वेगळे कलाकार दिसणार आहे. वरुण धवन आणि अर्जुन कपूरच्या नावावर आधीच शिक्कामोर्तब झालं होतं. आता शाहिद कपूरचीही सिनेमात एन्ट्री झाल्याची चर्चा आहे. 

'बॉलिवूड हंगामा'च्या वृत्तानुसार, बॉलिवूडचा रोमँटिक हिरो शाहिद कपूर सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे.  'नो एंट्री २' या बहुप्रतिक्षित चित्रपटात आता शाहिद कपूरची एन्ट्री झाली असून, या चित्रपटाची पटकथा त्याला प्रचंड आवडली आहे. शाहिद लवकरच या चित्रपटासाठी अधिकृत करार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'नो एंट्री २' मध्ये आधीच वरुण धवन आणि अर्जुन कपूर यांची नावे निश्चित झाली होती. आता शाहिद कपूरच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षकांना वरुण-अर्जुन-शाहिद ही नवी कोरी तिकडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. हे तीनही कलाकार प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यास यशस्वी ठरतील, असा विश्वास निर्मात्यांना वाटत आहे.

विशेष म्हणजे, या चित्रपटासाठी सुरुवातीला निर्मात्यांनी गायक-अभिनेता दिलजीत दोसांझला कास्ट केले होते. मात्र, काही कारणास्तव दिलजीतने या चित्रपटातून माघार घेतली. निर्माते बोनी कपूर यांनी दिलजीतची सिनेमातून एक्झिट कन्फर्म असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता शाहिद कपूर सिनेमात काय मजा आणतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अद्याप मेकर्सने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. 

शाहिद कपूर सध्या रश्मिका मंदाना आणि कृती सेनॉन यांच्यासोबत 'कॉकटेल २' या चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटातील गाणी आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहेत. याशिवाय, या वर्षाच्या सुरुवातीला शाहिद विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'ओ रोमियो' या चित्रपटात झळकला होता, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Shahid Kapoor joins Varun Dhawan and Arjun Kapoor in No Entry 2

Web Summary : Shahid Kapoor is reportedly joining Varun Dhawan and Arjun Kapoor in 'No Entry 2' after Diljit Dosanjh's exit. The film, a sequel to the 2005 hit, revolves around extramarital affairs and promises comedy.
टॅग्स :वरूण धवनअर्जुन कपूरबॉलिवूडशाहिद कपूर