Join us  

करण जोहरच्या घरच्या पार्टीतील कथित ड्रगबाबत समोर आला फॉरेन्सिक रिपोर्ट, म्हणाले -

By अमित इंगोले | Published: October 26, 2020 12:30 PM

२०१९ मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या एका पार्टीचा व्हिडीओ चर्चेत आला होता. हा व्हिडीओ पाहून आरोप लावण्यात आले होते की, व्हिडीओत असलेले सगळे स्टार ड्रग्सच्या नशेत आहेत आणि या पार्टीत ड्रग्सचा वापर झाला होता.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर या केसच्या तपासातून ड्रग्सचा अ‍ॅंगल समोर आला होता. यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील नेपोटिज्मसोबत ड्रग्सवरूनही अनेक गंभीर आरोप झाले होते. असे बोलले जात होते की, इंडस्ट्रीतील जास्तीत जास्त पार्ट्यांमध्ये मोठे सेलिब्रिटी ड्रग्स घेतात. अशातच २०१९ मध्ये करण जोहरच्या घरी झालेल्या एका पार्टीचा व्हिडीओ चर्चेत आला होता. हा व्हिडीओ पाहून आरोप लावण्यात आले होते की, व्हिडीओत असलेले सगळे स्टार ड्रग्सच्या नशेत आहेत आणि या पार्टीत ड्रग्सचा वापर झाला होता. पण आता एका फॉरेन्सिक रिपोर्टने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार, फॉरेन्सिक सायन्स लेबॉरेटरी्या अधिकाऱ्यांनी करण जोहरच्या या पार्टीच्या व्हिडीओला क्लीन चीट दिली आहे. सोबतच सांगितले की, या पार्टीत कोणत्याही प्रकारच्या ड्रगचा वापर करण्यात आलेला नाही. यात ड्रग दिसून येत नाहीये. व्हिडीओत एके ठिकाणी पांढरी लाइन दिसत आहे. ज्यावरून दावा करण्यात आला होता की, ती ड्रगची लाइन आहे. मात्र, फॉरेन्सिक तपास टीमने सांगितले की, ती ड्रग्सची लाइन नसून केवळ एका ट्यूबलाइटची सावली आहे. 

दरम्यान, याआधीही करण जोहर याने अनेकदा या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. तो हेही म्हणाला होता की, त्याच्या घरी झालेल्या पार्टीत कोणत्याही प्रकारच्या ड्रगचा वापर केलेला नाही. करण जोहरच्या घरी झालेल्या या पार्टीत अभिनेत्री दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, रणबीर कपूर, विकी कौशल, शाहिद कपूर, मीरा राजपूत, वरूण धवन, झोया अख्तर आणि अयान मुखर्जी हे स्टार सामिल झाले होते. 

कंगनाने केला दावा

दरम्यान, कंगनानेही बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणावर जोरदार हल्ला चढवला होता. इंडस्ट्रीतील जास्तीत जास्त लोक ड्रग्स घेतात असा तिने दावा केला होता. इतकेच नाही तर तिने रणवीर सिंह आणि रणबीर कपूरला टेस्ट करण्याचं आव्हानही दिलं होतं. त्यानंतर अनेकांनी असे दावे केले. या दाव्यांमुळे इंडस्ट्रीत दोन भागात विभागली गेल्याचेही दिसले. अनेक स्टार्सनी कंगनाच्या या वक्तव्याचा विरोधा केला होता. 

टॅग्स :करण जोहरअमली पदार्थबॉलिवूडदीपिका पादुकोणरणबीर कपूर